Vice President Election 2025: भारतातील उपराष्ट्रपती निवडणुकीचा इतिहास आणि राजकीय संघर्ष
Vice President Election 2025: भारतातील उपराष्ट्रपती निवडणुकीचा इतिहास आणि राजकीय संघर्ष
Vice President Election 2025: ९ सप्टेंबरला होणाऱ्या उपराष्ट्रपती निवडणुकीकडे देशाचे लक्ष लागले आहे. कधी बिनविरोध, कधी काट्याची टक्कर, जाणून घ्या भारतातील उपराष्ट्रपती निवडणुकीचा इतिहास.
सायली मेमाणे
पुणे २० ऑगस्ट २०२५ : भारताच्या राजकीय व्यवस्थेत राष्ट्रपती पदानंतर उपराष्ट्रपती हे दुसरे महत्त्वाचे पद मानले जाते. संसदेमधील राज्यसभेचे सभापती म्हणूनही उपराष्ट्रपतींना विशेष स्थान आहे. सध्याचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी अचानक दिलेल्या राजीनाम्यानंतर देशात उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीची चर्चा वेगाने सुरू झाली आहे. ९ सप्टेंबर २०२५ रोजी होणाऱ्या या निवडणुकीसाठी भाजपच्या नेतृत्त्वाखालील एनडीए आणि विरोधी INDIA आघाडीने आपापले उमेदवार उभे केले आहेत. सुरुवातीला ही निवडणूक बिनविरोध होईल अशी शक्यता वर्तवली जात होती, परंतु आता विरोधकांनीही उमेदवार दिल्याने ही लढत अधिक रंगतदार होण्याची चिन्हे आहेत.
भारताच्या उपराष्ट्रपती पदासाठी आतापर्यंत एकूण १६ निवडणुका झाल्या आहेत. यामध्ये चार वेळा निवडणूक बिनविरोध पार पडली. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे पहिले उपराष्ट्रपती होते, जे नंतर राष्ट्रपतीपदी विराजमान झाले. त्यानंतरही अनेक दिग्गज नेत्यांनी या पदाची शोभा वाढवली. काही वेळा निवडणूक बिनविरोध झाली तर काही वेळा काट्याची टक्कर पाहायला मिळाली. उपराष्ट्रपती पदाचा इतिहास पाहिला तर बहुतेक वेळा सत्ताधारी पक्षाला यश मिळालेले आहे.
१९७० मध्ये झालेल्या निवडणुकीतही विरोधकांनी कडवी झुंज दिली होती. त्यावेळी व्ही. व्ही. गिरी आणि गा.स. पाठक यांच्यात मोठी राजकीय चुरस पाहायला मिळाली. तसेच, १९९२ मध्ये डॉ. शंकर दयाल शर्मा राष्ट्रपती झाल्यानंतर उपराष्ट्रपती निवडणुकीत कडवी लढत झाली होती. २०१७ मध्ये उपराष्ट्रपती निवडणुकीत भाजपच्या उमेदवार एम. वेंकय्या नायडू यांनी काँग्रेसच्या गोपाळकृष्ण गांधी यांचा पराभव करून विजय मिळवला. २०२२ मध्ये जगदीप धनखड उपराष्ट्रपती म्हणून निवडून आले होते.
२०२५ मधील आगामी निवडणूक या ऐतिहासिक पार्श्वभूमीवर अधिक महत्वाची ठरत आहे. भाजपच्या नेतृत्त्वाखालील एनडीएकडे राज्यसभा व लोकसभेत संख्याबळ आहे, परंतु INDIA आघाडीने विरोधी एकता दाखवत जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. या निवडणुकीचा निकाल केवळ एका व्यक्तीच्या विजय-पराभवापलीकडे जाऊन आगामी लोकसभा निवडणुकीतील राजकीय समीकरणांनाही दिशा देऊ शकतो. त्यामुळे या निवडणुकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
भारतातील उपराष्ट्रपती निवडणुका नेहमीच राजकीय घडामोडींचे प्रतिबिंब दाखवत आल्या आहेत. कधी सत्ताधाऱ्यांची ताकद बिनविरोध निवडणुकीत दिसून आली तर कधी विरोधकांच्या एकजुटीने सत्ता पक्षाला धक्का दिला. २०२५ ची निवडणूक कोणत्या दिशेने जाते हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter