Viral Video: लांब पल्ल्याच्या ट्रेनमध्ये खुलेआम दारूची विक्री; मंगला लक्षदीप एक्सप्रेसचा व्हिडीओ सोशल मीडियावर गाजत

0
Viral Video: लांब पल्ल्याच्या ट्रेनमध्ये खुलेआम दारूची विक्री; मंगला लक्षदीप एक्सप्रेसचा व्हिडीओ सोशल मीडियावर गाजत

Viral Video: लांब पल्ल्याच्या ट्रेनमध्ये खुलेआम दारूची विक्री; मंगला लक्षदीप एक्सप्रेसचा व्हिडीओ सोशल मीडियावर गाजत


मंगला लक्षदीप एक्सप्रेसमधील दारूची खुलेआम विक्रीचा कथित व्हिडीओ व्हायरल. तरुणी बॅगमधून दारू, गुटखा, पानमसाला विकताना दिसली. प्रवाशांचा संताप, रेल्वेतील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह.


पुणे ८ डिसेंबर २०२५ : मुंबई–कोकण रेल्वे मार्गावरील लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये खुलेआम दारू विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओमुळे रेल्वे सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. या व्हिडिओमध्ये एक तरुणी बॅगमध्ये दारूच्या बाटल्या, गुटखा, पानमसाला आणि इतर पदार्थ घेऊन प्रवाशांना विक्री करताना दिसत आहे. ती ‘दारू, दारू’ असे ओरडत असल्याचेही व्हिडिओत स्पष्ट दिसते. काही प्रवासी तिच्याकडून दारूच्या बाटल्या घेण्यासाठी त्या जागी गोळा झालेले दिसतात.

हा व्हिडिओ नेमका कोणत्या ट्रेनमधला आहे याची अधिकृत पुष्टी नसली तरी तो मंगला लक्षदीप एक्सप्रेस (12617) मधील असल्याचे सांगितले जात आहे. तसेच हा व्हिडिओ रत्नागिरी स्थानकावर शूट केल्याची माहितीही काही प्रवाशांकडून पुढे आली आहे. रत्नागिरी स्टेशनवर मंगला लक्षदीप एक्सप्रेस सकाळी दाखल झाली असताना हा प्रकार घडल्याचे बोलले जात आहे.

विशेष म्हणजे या गाडीत टीसी उपस्थित असतानाही आणि रेल्वे पोलिसांकडून नियमित गस्त सुरू असतानाही दारूची मुक्त आणि उघडपणे विक्री कशी केली जाते, हा मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे. व्हिडिओमध्ये दारू सोबतच गुटखा, पानमसाला, पाणी आणि चकणा देखील विक्रीसाठी उपलब्ध असल्याचे दिसते. परवानाधारक विक्रेत्यांऐवजी अनधिकृत व्यक्ती रेल्वे डब्यांमध्ये अशा प्रकारचे पदार्थ विकताना दिसत असल्याने प्रवाशांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

कोकण रेल्वे मार्गावर यापूर्वीही सिगारेट, गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांची बेकायदेशीर विक्री होत असल्याच्या तक्रारी समोर आल्या होत्या. मात्र आता दारूची विक्रीही सुरू असल्याचे उघड झाल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे. रेल्वेत दारूचे सेवन, दारू बाळगणे किंवा दारू विकणे पूर्णपणे बंदीस्त आहे. तरीही शंभर ते तीनशे रुपयांदराने दारूच्या बाटल्या विकल्या जात असल्याचे व्हिडिओत दिसत आहे.

या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी, तसेच रेल्वेमध्ये गस्त वाढवावी, अशी मागणी काही प्रवाशांनी केली आहे. रेल्वे मंत्रालयाने तातडीने हस्तक्षेप करून अशा घटनांवर कठोर कारवाई करावी, असेही मत व्यक्त केले जात आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेला आणि शिस्तीला धोका पोहोचवणाऱ्या या घटना गांभीर्याने घेण्याची गरज असल्याचे नागरिक सांगत आहेत.

एनडीटीव्ही मराठीने हा व्हिडिओ कोणत्या गाडीचा आहे याची स्वतंत्र पुष्टी केलेली नसली तरी कोकण रेल्वे मार्गावरच्या काही गाड्यांमध्ये अशा प्रकारचे प्रकार होत असल्याच्या तक्रारी नियमितपणे येत असल्याचे समजते. रेल्वे प्रशासनाने अशा अनधिकृत विक्रेत्यांवर कारवाई न केल्यास परिस्थिती आणखी बिघडू शकते, असा इशारा प्रवासी देत आहेत.

Follow us on our social media handles:
Instagram – https://www.instagram.com/newsdotz/
YouTube – https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook – https://www.facebook.com/NewsDotz/
Twitter – https://x.com/NewsDotz

Also Read: Pune’s Latest Information

FacebookWhatsAppXTelegramThreadsLinkedInGmailShare

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed