ईडीच्या धडाकेबाज कारवाईत ‘गुजरात समाचार’चे मालक बाहुबली शाह अटकेतईडीच्या धडाकेबाज कारवाईत

0
ईडीच्या धडाकेबाज कारवाईत ‘गुजरात समाचार’चे मालक बाहुबली शाह अटकेत

ईडीच्या धडाकेबाज कारवाईत ‘गुजरात समाचार’चे मालक बाहुबली शाह अटकेत

ईडीने मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ‘गुजरात समाचार’चे संचालक बाहुबली शाह यांना अटक केली आहे. ३६ तास चाललेल्या छापेमारीनंतर ही कारवाई करण्यात आली.

सायली मेमाणे,


पुणे १७ मे २०२५ ; गुजरातमधील प्रख्यात वृत्तपत्र गुजरात समाचार आणि त्याचे संचालक बाहुबली शाह यांच्याविरोधात आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणात कारवाई करत ईडीने त्यांना ताब्यात घेतले आहे. ईडी आणि आयकर विभागाने मिळून तब्बल ३६ तास विविध ठिकाणी छापे टाकून ही कारवाई केली.

७३ वर्षीय शाह यांच्यावर मनी लॉन्ड्रिंगसंबंधी गंभीर आरोप आहेत. ही घटना समोर आल्यानंतर राज्यात राजकीय वादंग उठले असून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर माध्यमांवर दबाव आणण्याचा आरोप केला आहे.

१९३२ पासून सुरु असलेले गुजरात समाचार हे गुजरातमधील एक विश्वासार्ह वृत्तपत्र मानले जाते. या दैनिकाचा कारभार लोक प्रकाशन लिमिटेड या कंपनीमार्फत चालवला जातो, तर शाह कुटुंबीयांची दुसरी कंपनी गुजरात समाचार लिमिटेड जीएसटीव्ही नावाचे वृत्तवाहिनी संचालन करते.

बाहुबली शाह हे लोक प्रकाशनचे संचालक आहेत, तर त्यांचे बंधू श्रेयांश शाह हे मुख्य संपादकपदी कार्यरत आहेत. या कुटुंबाचे सुमारे १५ विविध व्यवसाय असल्याचे सांगितले जाते. गुजरात समाचार हे वृत्तपत्र आपल्या निर्भीड पत्रकारितेसाठी आणि सत्ताधाऱ्यांवर प्रश्न विचारण्यासाठी प्रसिद्ध आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed