कोपरखैरणे आत्महत्या प्रकरण: पीडित कुटुंबाला शिवसेनेचा मदतीचा हात; किशोर पाटकर यांच्या हस्ते १० लाखांची मदत

0
पीडित कुटुंबाला शिवसेनेचा मदतीचा हात

पीडित कुटुंबाला शिवसेनेचा मदतीचा हात

सावकारी जाचाला कंटाळून आत्महत्या केलेल्या रवींद्र शिंदे यांच्या कुटुंबाला शिवसेनेने १० लाखांची मदत केली; शिंदे कुटुंबियांच्या अश्रूंचा बांध फुटला.

सायली मेमाणे

नवी मुंबई १० जुलै २०२५ : कोपरखैरणे (नवी मुंबई) येथील ३९ वर्षीय रवींद्र शिंदे यांनी सावकारी जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली होती. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असतानाच, शिंदे गटाच्या शिवसेनेतर्फे त्या पीडित कुटुंबाला १० लाख रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली आहे. बेलापूर विधानसभा क्षेत्राचे शिवसेना जिल्हाप्रमुख किशोर पाटकर यांच्या हस्ते ही रक्कम स्व. शिंदे यांच्या पत्नी व मुलीच्या स्वाधीन करण्यात आली. या मदतीमुळे कुटुंबियांना थोडासा दिलासा मिळाला असून, मदतीच्या वेळी त्यांच्या अश्रूंना बांध फुटला.

रवींद्र शिंदे यांनी प्रथमेश चव्हाण नावाच्या व्यक्तीकडून केवळ २५ हजार रुपये व्याजाने घेतले होते. मात्र चक्रवाढ व्याज आणि तगाद्यामुळे निर्माण झालेल्या मानसिक तणावामुळे त्यांनी आत्महत्येचा मार्ग पत्करला. त्यांच्या मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत त्यांनी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उद्देशून “कृपया माझ्या कुटुंबाला सांभाळा” असा भावनिक संदेश दिला होता. ही बाब वर्तमानपत्रातून समोर येताच जिल्हाप्रमुख किशोर पाटकर यांनी तातडीने पावले उचलून कुटुंबाशी संपर्क साधला.

या प्रसंगी महिला जिल्हा प्रमुख शीतल कचरे, ऋषी पाटील यांच्यासह स्थानिक शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नीनेही पीडित कुटुंबाशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून त्यांचे सांत्वन केले.

घटनेबाबत अधिक माहिती देताना किशोर पाटकर म्हणाले, “फक्त २५ हजार रुपयांच्या पायी एका कुटुंबातील व्यक्तीला आत्महत्या करावी लागणे अत्यंत निंदनीय आहे. अशा सावकारांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे. आम्ही यासाठी प्रशासकीय पाठपुरावा करणार असून, शिवसेना कायम या कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील.”

ही घटना केवळ एका कुटुंबाचे दु:ख नाही तर संपूर्ण समाजाला सावध करणारी आहे. चक्रवाढ व्याजाच्या विळख्यात अडकलेल्या नागरिकांसाठी ही एक सशक्त संदेश देणारी कारवाई ठरू शकते. पोलिसांकडे याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली असून, दोषी सावकारांविरोधात गुन्हा दाखल केला जाण्याची प्रक्रिया सुरू आहे.

पीडित कुटुंबाला मिळालेली ही मदत ही केवळ आर्थिक नव्हे, तर मानसिक आधारदेखील आहे. स्व. रवींद्र शिंदे यांची चिठ्ठी सरकारपर्यंत पोहोचली असून त्यावर कार्यवाही सुरू झाल्याची चिन्हं दिसू लागली आहेत. पुढे यासारखे प्रकार रोखण्यासाठी सावकारी नियंत्रण यंत्रणा अधिक सक्रीय करण्याची गरजही आता अधोरेखित होत आहे.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed