कोलकाता लॉ कॉलेजमध्ये विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार; TMC नेत्यासह 3 आरोपी अटकेत

0
कोलकाता लॉ कॉलेजमध्ये विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार

कोलकाता लॉ कॉलेजमध्ये विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार

कोलकाता: दक्षिण कोलकाता लॉ कॉलेजच्या कॅम्पसमध्ये विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार, TMC चे संबंध असलेला माजी विद्यार्थी आणि 2 विद्यमान विद्यार्थ्यांना पोलिसांकडून अटक; तपास सुरू

सायली मेमाणे

२७ जून २०२५ : कोलकात्याच्या नामवंत दक्षिण कोलकाता लॉ कॉलेजमध्ये एका विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. २५ जून रोजी रात्री कॉलेज कॅम्पसच्या आवारात सायंकाळी ७:३० ते १०:५० या वेळेत ही अमानुष घटना घडली. पीडित विद्यार्थिनीने तक्रार दाखल केल्यानंतर कसबा पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी त्वरीत कारवाई करत तीन आरोपींना अटक केली आहे.

मुख्य आरोपी मनोजित मिश्रा (३१) हा महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी असून दक्षिण कोलकाता टीएमसीपीचा जिल्हा सरचिटणीस होता. त्याचे सत्ताधारी तृणमूल काँग्रेसशी थेट राजकीय संबंध असल्याचे स्पष्ट झाले आहे. इतर दोघे आरोपी जैब अहमद (१९) आणि प्रमित मुखर्जी (२०) हे याच कॉलेजमध्ये शिकत आहेत. पीडित विद्यार्थिनीने आरोपी मनोजित याच्या लग्नाच्या प्रस्तावाला नकार दिला होता, याचा राग मनात धरून त्याने आपल्या साथीदारांसह तिच्यावर बलात्कार केला. झटापटीत पीडितेला दुखापतही झाली.

घटनेनंतर पोलिसांनी पीडितेची वैद्यकीय तपासणी करून जबाब नोंदवले आहेत. पोलिसांकडून या प्रकरणातील साक्षीदारांचे जबाब घेतले गेले असून, कॅम्पसचा तो भाग सील करण्यात आला आहे. फॉरेन्सिक तपास सुरू आहे. पोलिसांनी तिन्ही आरोपींचे मोबाईल जप्त केले असून त्यातील पुरावे तपासले जात आहेत. कसबा पोलिसांनी सिद्धार्थ शिशु रॉय उद्यानाजवळून दोन आरोपींना अटक केली, तर तिसरा आरोपी घरातून पकडण्यात आला.

या घटनेने महाविद्यालयीन वर्तुळात संताप निर्माण केला असून पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. कॉलेज प्रशासनाकडून अद्याप प्रतिक्रिया मिळालेली नाही. आरोपींना अलीपूर न्यायालयात हजर करण्यात आले असून पोलिसांनी १४ दिवसांची कोठडी मागितली होती. न्यायालयाने तिघांना पुढील मंगळवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

घटनेच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि त्यांच्या सरकारवर तीव्र टीका केली आहे. या प्रकरणाचा राजकीय रंग अधिकच गडद होत आहे. आता तपासातून या गुन्ह्यामागील सर्व सत्य समोर येणे अपेक्षित आहे.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed