नाशिकमध्ये कंत्राटदारांचा संताप: थकीत बिलांमुळे शासनाची ‘अंत्ययात्रा’

0
नाशिकमध्ये कंत्राटदारांचा संताप: थकीत बिलांमुळे शासनाची ‘अंत्ययात्रा’

नाशिकमध्ये कंत्राटदारांचा संताप: थकीत बिलांमुळे शासनाची ‘अंत्ययात्रा’

नाशिकमध्ये थकीत कोट्यवधी रुपयांच्या बिले न दिल्याने कंत्राटदार संतापले; 19 ऑगस्टपासून सुरू असलेल्या तिन दिवसीय आंदोलनात बांधकाम विभागाच्या कार्यालयाबाहेर अंत्ययात्रा काढली.

सायली मेमाणे

पुणे २१ ऑगस्ट २०२५ :नाशिक: महाराष्ट्र शासनाकडून थकीत कोट्यवधी रुपयांच्या बिलांमुळे राज्यातील लाखो शासकीय कंत्राटदार हतबल झाले आहेत. विविध कंत्राटदार संघटनांच्या माहितीनुसार, राज्यातील सर्व विभागांचा थकीत बिलांचा आकडा ९० हजार कोटी रुपयांच्या वर पोहोचला आहे. कंत्राटदारांनी वारंवार पाठपुरावा करूनही आपले पैसे न मिळाल्याने आता संताप उफाळून आला आहे.

नाशिकमध्ये कंत्राटदार संघटना आक्रमक झाली असून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाबाहेर निषेध व्यक्त करत आहेत. १९ ऑगस्टपासून सुरू असलेल्या तिन दिवसांच्या आंदोलनाचा आज एक महत्वाचा टप्पा म्हणजे शासनाची ‘अंत्ययात्रा’ काढणे. या अंत्ययात्रेत कंत्राटदारांनी शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

कंत्राटदारांचे म्हणणे आहे की, शासनाने त्यांच्यासोबत फसवणूक केली आहे. अशा परिस्थितीत त्यांनी सरकारला तातडीने बिलांच्या थकबाकीची तरतूद करण्याचे आवाहन केले आहे. स्थानिक प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभागाला देखील या तक्रारीकडे गांभीर्याने पाहावे लागणार आहे.

या आंदोलनामुळे स्थानिक प्रशासन आणि शासन यांच्यासाठी दबाव निर्माण झाला असून, कंत्राटदारांच्या मागण्यांकडे त्वरीत उपाययोजना करण्याची गरज आहे.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *