पालखी महामार्गावर झाडतोड, ठेकेदाराने पर्यावरणाकडे दुर्लक्ष; “वृक्षवल्ली आम्हा ना सोयरी”

0
पालखी महामार्गावर झाडतोड, ठेकेदाराने पर्यावरणाकडे दुर्लक्ष; “वृक्षवल्ली आम्हा ना सोयरी”

पालखी महामार्गावर झाडतोड, ठेकेदाराने पर्यावरणाकडे दुर्लक्ष; “वृक्षवल्ली आम्हा ना सोयरी”

संत तुकाराम पालखी महामार्गावर शेकडो वर्षां जुनी झाडे तोडली; नव्याने वृक्षलागवड न झाल्याने नागरिक संतप्त. पर्यावरणीय असमतोल आणि उष्णतेचा धोका वाढला, ठेकेदाराची दुर्लक्षाची टीका.

संत तुकाराम महाराज पालखी मार्गावरील रस्त्याच्या दुतर्फा असलेली शेकडो वर्षे जुनी झाडे तोडल्याने स्थानिक नागरिक, वारकरी आणि वाहनचालक संतप्त आहेत. पालखी महामार्गाच्या कामांमध्ये पर्यावरणपूरक विकासाचे मोठे दावे करण्यात आले होते, पण प्रत्यक्षात ठेकेदार कंपनी झाडांच्या नव्याने लागवडीकडे दुर्लक्ष करत असल्याचे चित्र स्पष्ट दिसते.

पालखी महामार्गाच्या कामात वड, पिंपळ, लिंब, चिंच, आंबा आणि नारळ यांसारखी झाडे तोडली गेली आहेत. नियमानुसार, रस्त्याच्या विकासासाठी झाडतोड झाल्यास किमान तितकीच किंवा अधिक झाडे नव्याने लावणे बंधनकारक आहे. मात्र बारामती ते इंदापूर दरम्यानच्या कामात हा नियम धाब्यावर बसवला गेला आहे, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित झाला आहे.

काम संथ गतीने सुरू असल्याने, ज्या ठिकाणी रस्ता पूर्ण झाला आहे त्या भागातही एकही झाड नव्याने लावलेले नाही. काही ठराविक ठिकाणी फक्त दिखाव्यासाठी वृक्षलागवड केल्याचे चित्र दिसते, तर उर्वरित भागात संपूर्ण रस्ता ओसाड व रखरखीत अवस्थेत आहे. त्यामुळे उन्हाळ्यात प्रचंड उष्णता, धुळीचे लोट आणि पर्यावरणीय असमतोल निर्माण झाला आहे.

महामार्गासाठी गावोगावी उंच ब्रिज, सेवा रस्त्यांचा अभाव आणि शेतजमिनींचे तुकडे झाल्यामुळे अनेक गावांचे सामाजिक आणि भौगोलिक विभाजनही झाले आहे. पालखी मार्गावरून प्रवास करणारे वाहनचालक, वारकरी आणि स्थानिक नागरिक झाडांच्या अनुपस्थितीमुळे हळहळ व्यक्त करत आहेत.

यद्यपि या महामार्गाच्या कामांमध्ये ज्यांच्या जमिनी गेल्या, त्यांना शासनाने मोठा मोबदला दिला आहे, तरीही संबंधित लाभार्थी शेतकरी वृक्षलागवडीबाबत आवाज उठवत नाहीत, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे “वृक्षवल्ली आम्हा सोयरी” हा संदेश आता पालखी मार्गावर बदलून “वृक्षवल्ली आम्हा ना सोयरी” झाला आहे.

ठेकेदार कंपनीने पर्यावरणीय नियमांची पाळी न करता काम केले आहे, तर पर्यावरण विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जिल्हा प्रशासन याकडे डोळेझाक करत आहेत, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित झाला आहे. वेळेत व्यापक वृक्षलागवड, देखभाल आणि जबाबदारी निश्चित न झाल्यास हा महामार्ग विकासाचा नव्हे तर पर्यावरणीय ऱ्हासाचा प्रतीक ठरेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

संत तुकाराम पालखी महामार्गाचे काम लिमटेक पर्यंत पूर्ण झाले आहे, परंतु लिपस्टिक पासून पुढे अनेक ठिकाणे अर्धवट अवस्थेत आहेत. लिमटेक उड्डाणपूल, भवानीनगर आणि सणसर येथील उड्डाणपूल अपूर्ण असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे.

नागरिकांचा असा विश्वास आहे की, पर्यावरणपूरक विकास हा फक्त घोषणात्मक राहू नये; ठेकेदाराने झाडतोडीच्या बदल्यात नियमांनुसार वृक्षलागवड करून, पर्यावरणीय संतुलन राखणे आवश्यक आहे. पालखी मार्गावर वादळ, उष्णता आणि धुळीच्या लोटामुळे होणाऱ्या समस्यांचा सामना नागरिक आणि वारकरी करत आहेत, आणि प्रशासनाने योग्य ती उपाययोजना करणे गरजेचे आहे.

Follow us on our social media handles:
Instagram – https://www.instagram.com/newsdotz/
YouTube – https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook – https://www.facebook.com/NewsDotz/
Twitter – https://x.com/NewsDotz

Also Read: Pune’s Latest Information

FacebookWhatsAppXTelegramThreadsLinkedInGmailShare

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed