पुण्यातील कात्रज, कोंढवा व येवलेवाडीत अनधिकृत डोंगरफोड, मुख्यमंत्री बाबातून महसूलमंत्री बावनकुळे ने कबुली दिली

0
पुण्यात कात्रज, कोंढवा व येवलेवाडीत डोंगरफोड

पुण्यात कात्रज, कोंढवा व येवलेवाडीत डोंगरफोड

कात्रज, कोंढवा, येवलेवाडीत डोंगरफोड व अनधिकृत प्लॉटिंग; महसूलमंत्री बावनकुळे यांनी विधानसभेत कबुली दिली. अहवाल व कारवाई सुरू आहे.

सायली मेमाणे

पुणे १२ july २०२५ : पुणे शहर व जिल्ह्यातील कात्रज, कोंढवा, येवलेवाडीसह पानशेत रस्ता परिसरात अनधिकृत डोंगरफोड आणि प्लॉटिंग होत असल्याची कबुली महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाराष्ट्र विधानसभेत शुक्रवारी दिली . त्यांनी सांगितले की भूगर्भ जलस्तर, जैवविविधता, परिसरातील हवामान आणि लोकजीवनावर झालेल्या परिणामाचा अहवाल तयार करण्याची कार्यवाही सुरू आहे.

भाजपचे आमदार भीमराव तापकीर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे बापूसाहेब पठारे यांनी जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणावर पर्यावरणाचा ऱ्हास होत असल्याची तक्रार विधानसभेत नोंदवली, त्यावर बावनकुळे यांनी डोंगरफोड होत असल्याची कबुली दिली.

खडकवासला, पानशेत रस्ता आणि आसपासच्या भागात अनधिकृत खनिज उत्खनन, झाडांची तोड व राडारोडा टाकण्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत आणि या सर्वांवर प्रशासनाकडून लक्ष देण्याचे आश्वासन मिळाले आहे. अवैध गौण खनिज उत्खननाच्या प्रकरणात हवेली तहसीलदारांनी नऊ प्रकरणांत १६ कोटींपेक्षा जास्त रकमेचा दंड ठोठावला असून वसुलीची प्रक्रिया सुरू आहे तसेच पुणे महापालिकेने आरक्षित जागांवर अनधिकृत बांधकाम व प्लॉटिंगसाठी गुन्हे दाखल केले आहेत.

नोंद आहे की, महापालिकेच्या आरक्षित जागांवर डोंगर उतारावर, माथ्यावर अनधिकृत प्लॉटिंग करून बांधकामे, गोदामे आणि रस्ते तयार करण्यात आल्याची माहिती बजावण्यात आली असून, त्या केल्या जाताना कोणतीही अधिकृत परवानगी न घेण्यात आल्याचे बावनकुळे यांनी विधानसभेत स्पष्ट केले. त्याचबरोबर अवैध उत्खननाबाबत कायद्यातील तरतुदी तपासून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यासाठी महसूल विभागाची बैठक झाली असून, पुणे महापालिकेला अनधिकृत बांधकामे हटविण्यासंदर्भात तातडीने कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .

पश्चिम रिंग रोडच्या बांधकामाला केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालयाकडून पर्यावरणीय मंजुरी मिळाली असली, तरी डोंगरफोडीमुळे भूगर्भ जलस्तर, हवामान, जैवविविधता व लोकजीवनावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करुन राज्य पर्यावरणीय मूल्यांकन प्रभाव समितीस अहवाल सादर केला जाणार आहे, अशी माहितीही मंत्रीांनी दिली.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed