बाबा सिद्दीकी यांची ओळख वापरून सायबर फसवणुकीचा प्रयत्न; दिल्लीतील तरुण अटकेत

0
बाबा सिद्दीकी यांची ओळख वापरून सायबर फसवणुकीचा प्रयत्न; दिल्लीतील तरुण अटकेत

बाबा सिद्दीकी यांची ओळख वापरून सायबर फसवणुकीचा प्रयत्न; दिल्लीतील तरुण अटकेत

माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या कुटुंबीयांच्या नावाने बनावट कागदपत्रे वापरून मोबाईल क्रमांक अ‍ॅक्टिव्हेट करण्याचा प्रयत्न; बँद्रा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल, दिल्लीतील तरुण अटकेत.

सायली मेमाणे

पुणे ७ जुलै २०२५ : माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या कुटुंबीयांच्या नावाने बनावट कागदपत्रांचा वापर करून मोबाईल क्रमांक अ‍ॅक्टिव्हेट करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका दिल्लीतील तरुणाला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. या सायबर फसवणुकीचा प्रयत्न बाबा सिद्दीकी यांच्या कन्या डॉ. अर्शिया सिद्दीकी यांच्या सतर्कतेमुळे उघडकीस आला.

ही घटना तेव्हा समोर आली जेव्हा एका नामांकित टेलिकॉम कंपनीला ‘शहझीन सिद्दीकी’ या नावाने ई-मेल प्राप्त झाला. त्या मेलमध्ये एक मोबाईल नंबर अ‍ॅक्टिव्हेट करण्यासाठी अधिकृत विनंती करण्यात आली होती. या मेलसोबत आधार कार्ड, पॅन कार्ड, जीएसटी तपशील आणि सिद्दीकी कुटुंबाच्या व्यवसायाच्या बनावट लेटरहेडसह कागदपत्रे जोडलेली होती. विशेष म्हणजे या मेलमध्ये डॉ. अर्शिया सिद्दीकी यांना सीसीमध्ये ठेवण्यात आलं होतं. त्यामुळे त्यांच्या संशयास पुष्टी मिळाली आणि त्यांनी तातडीने कुटुंबीयांना याची माहिती दिली.

यावरून कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली असता, ही सगळी कागदपत्रे बनावट असल्याचे निष्पन्न झाले. यानंतर डॉ. अर्शिया सिद्दीकी यांनी बँद्रा पोलिस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल केली. या तक्रारीनंतर पोलिसांनी दिल्लीतून एका संशयित आरोपीला अटक केली असून त्याच्या विरोधात सायबर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये मुंबईतील बांद्रा परिसरात बाबा सिद्दीकी यांच्यावर तीन व्यक्तींनी गोळ्या झाडत हत्या केली होती. हे प्रकरण त्यावेळी मोठ्या चर्चेचा विषय ठरले होते. या हत्येप्रकरणी धमरराज राजेश कश्यप, गुरमैल बलजित सिंग आणि प्रविण लोंकार या तिघांना अटक करण्यात आली आहे.

या नव्या सायबर फसवणुकीच्या प्रकारामुळे पुन्हा एकदा सुरक्षा यंत्रणा आणि व्यक्तीगत माहितीच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरु असून, आरोपीने हे बनावट कागदपत्र कसे आणि कुठून मिळवले याची चौकशी सुरु आहे.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed