बारामती अपघातानंतर पोलिसांचा आक्शन मोड सुरू, 14 डंपर जप्त

0
बारामती अपघातानंतर पोलिसांचा आक्शन मोड सुरू, 14 डंपर जप्त

बारामती अपघातानंतर पोलिसांचा आक्शन मोड सुरू, 14 डंपर जप्त

खंडोबा नगर अपघातात तिघांचा मृत्यू झाल्यानंतर बारामती पोलीस ॲक्शन मोडवर; 14 ओव्हरलोड डंपर जप्त, खटले दाखल. वाहतूक सुरक्षेवर आता अधिक लक्ष.

सायली मेमाणे

बारामती २९ जुलै २०२५ : रविवारी बारामती शहरातील खंडोबा नगर येथे घडलेल्या भीषण अपघातानंतर पोलीस प्रशासन हालचालीत आले आहे. या अपघातात तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली होती. नागरिकांकडून जोरदार संताप व्यक्त करण्यात येत होता. अखेर पोलीस विभागाने आता ओव्हरलोड वाहतूक करणाऱ्या डंपर गाड्यांवर कडक कारवाई सुरू केली आहे.

या प्रकरणानंतर बारामती पोलिसांनी शहर आणि परिसरात ओव्हरलोड व बेदरकारपणे चालविल्या जाणाऱ्या डंपर गाड्यांविरोधात मोहीम राबवली. यामध्ये तब्बल 14 वाहने जप्त करण्यात आली असून त्यांच्या चालकांविरोधात कायदेशीर कारवाई केली गेली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या डंपर गाड्या रस्त्याच्या क्षमतेपेक्षा जास्त माल वाहत होत्या, तसेच काही वाहनचालकांकडे योग्य परवानेही नव्हते. त्यामुळे रस्ते अधिक धोकादायक होत होते आणि अशा प्रकारचे अपघात होण्याची शक्यता अधिक वाढते.

यावेळी नागरिकांनी वारंवार तक्रार केली होती की, खाण व्यवसायांमधून येणारे डंपर वाहनचालक बेदरकार पद्धतीने वाहन चालवत असून, यामुळे नागरिकांच्या सुरक्षेला मोठा धोका निर्माण झाला आहे.

पोलीस निरीक्षकांनी सांगितले की, “या प्रकरणानंतर आम्ही विशेष मोहीम सुरू केली आहे. ज्या वाहनांमध्ये नियमभंग झाला आहे, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. अपघात टाळण्यासाठी नियमित तपासणी आणि नाकाबंदी सुरूच राहील.”

तसेच, नागरिकांनी वाहतूक संबंधित अडचणी किंवा नियमभंग पाहिल्यास पोलिसांशी संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

ही कारवाई भविष्यातील अपघात टाळण्यासाठी आणि नागरिकांचा जीव सुरक्षित ठेवण्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed