माळेगाव साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी आज अजित पवार विराजमान; उपाध्यक्ष पदासाठी नावांवर चर्चा

0
माळेगाव साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी आज अजित पवार विराजमान

माळेगाव साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी आज अजित पवार विराजमान

माळेगाव साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी आज उपमुख्यमंत्री अजित पवार विराजमान होणार आहेत. उपाध्यक्ष पदासाठी कोणाची वर्णी लागणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सायली मेमाणे

माळेगाव ५ जुलै २०२५ : माळेगाव साखर कारखाना, अजित पवार अध्यक्ष, उपमुख्यमंत्री अजित पवार, माळेगाव अध्यक्ष निवड, माळेगाव कारखाना निवडणूक, उपाध्यक्ष पद, संगीता कोकरे, नीरावागज गट, बारामती राजकारण, चंद्रराव तावरे, शरद पवार, राष्ट्रवादी शरद पवार, जयपाल देवकाते, विलास देवकाते, महिला राखीव जागा

Article:

माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. आज शनिवारी (दि. ५ जुलै) माळेगाव कारखान्याच्या संचालक मंडळाची महत्त्वपूर्ण बैठक होणार असून, या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची अध्यक्षपदी निवड निश्चित होणार आहे. त्यांनी यापूर्वीच जाहीर केले होते की, “या कारखान्याचा अध्यक्ष मी स्वतः होणार आहे”, आणि त्यांनी आभार मेळाव्यातही ही भूमिका पुन्हा एकदा अधोरेखित केली होती.

२१ पैकी २० जागा जिंकून श्री नीलकंठेश्वर पॅनलने निर्विवाद बहुमत मिळवले आहे. फक्त एक जागा ‘सहकार बचाव पॅनल’चे चंद्रराव तावरे यांनी जिंकली. त्यामुळे अध्यक्षपदी अजित पवार यांची निवड ही सर्वानुमते ठरणार असल्याची खात्री आहे.

या निवडणूक प्रक्रियेस प्रांताधिकारी वैभव नावडकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार असून, अध्यक्षपदासह उपाध्यक्ष पदावर कोणाची वर्णी लागणार, याची उत्सुकता ताणली गेली आहे.

उपाध्यक्ष पदासाठी नीरावागज गटातील अविनाश देवकाते, जयपाल देवकाते, विलास देवकाते यांची नावे चर्चेत असून, महिला राखीवमधून निवडून आलेल्या संगीता कोकरे किंवा ज्योती मुलमुले या दोघींपैकी एकीला देखील संधी मिळू शकते. त्यामुळे हे पद नीरावागज गटाकडे जाईल की पणदरे गटाकडे, हे आजच्या निवडीत स्पष्ट होईल.

२४ जून रोजी झालेल्या मतमोजणीत शरद पवार, अजित पवार, चंद्रराव तावरे यांच्यात चुरशीची लढत झाली होती. या निवडणुकीत अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने दणदणीत विजय मिळवला. त्यामुळे बारामतीच्या राजकारणातही हा निकाल महत्त्वाचा ठरतोय.

माळेगाव कारखान्यावर अजित पवार यांची अधिकृत ताबा मिळाल्यानंतर सहकार क्षेत्रात त्यांचा वर्चस्व अधिक बळकट होणार आहे. उपाध्यक्ष पदाची घोषणा होताच ही निवडणूक पूर्णत्वास जाणार आहे.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed