कोंढवा परिसरात तिजोरीवर डल्ला : दाजीच्या घरातून लाखोंचा ऐवज लंपास करणारा आरोपी मेव्हणा जेरबंद

0
कोंढवा चोरी प्रकरण: दाजीच्या घरीच चोरी करणारा मेव्हणा अटकेत, 2.46 लाखांचा ऐवज जप्त

कोंढवा चोरी प्रकरण: दाजीच्या घरीच चोरी करणारा मेव्हणा अटकेत, 2.46 लाखांचा ऐवज जप्त

कोंढवा परिसरात दाजीच्या घरातून 2.46 लाख रुपये किमतीचे दागिने व रोकड चोरल्याप्रकरणी मेव्हण्याला पोलिसांनी अटक केली. आरोपीकडून संपूर्ण ऐवज जप्त, पोलिसांची यशस्वी कारवाई.

रिपोर्टर : झोहेब शेख

पुणे ११ जुलै २०२५ : पुणे : कोंढवा परिसरात घरफोडी करून तब्बल २ लाख ४६ हजार रुपयांचे दागिने व रोकड लंपास करणाऱ्या चोरट्याला कोंढवा पोलिसांनी अटक केली आहे. विशेष म्हणजे या गुन्ह्याचा आरोपी स्वतःच्या दाजीकडील फ्लॅटमध्येच चोरी करून पसार झाला होता. पोलिसांनी तातडीने तपास करत आरोपीकडून चोरीस गेलेला सर्व ऐवज हस्तगत केला आहे.

फिर्यादी व त्यांचे कुटुंब काही कामानिमित्त बाहेर गेले असताना अज्ञात व्यक्तीने त्यांच्या फ्लॅटचे कुलूप तोडून बेडरूममधील कपाटातून सोन्या-चांदीचे दागिने व रोकड असा एकूण २,४६,००० रुपयांचा ऐवज चोरी करून नेला होता. फिर्यादीच्या तक्रारीवरून कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक राकेश जाधव आणि त्यांच्या पथकाने तपास सुरू करताच, पोलीस अंमलदार अनिल बनकर आणि केशव हिरवे यांना माहिती मिळाली की, रोहेल अरशद शेख (३६) नावाचा इसम चोरीप्रकरणी संशयित आहे. तत्काळ कारवाई करत पोलिसांनी त्यास अटक केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

विशेष म्हणजे, रोहेल याने आपल्या दाजीकडील तिजोरीच फोडली होती, हे तपासात निष्पन्न झाले. आरोपीकडून चोरीस गेलेला पूर्ण ऐवज पोलिसांनी हस्तगत केला आहे.

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उप-आयुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहाय्यक आयुक्त धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यशस्वी कारवाईत सहा. पो.नि. राकेश जाधव, पो. अं. सतिश चव्हाण, विशाल मेमाणे, निलेश देसाई यांच्यासह १५ हून अधिक पोलिसांचा सहभाग होता.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed