गुंजन चौकात पिस्टल विक्रीसाठी आलेल्या सराईत गुन्हेगाराला येरवडा पोलिसांनी केले जेरबंद

0
गुंजन चौक, पुणे येथे पिस्टल विक्रीसाठी आलेला सराईत गुन्हेगार येरवडा पोलिसांनी पकडला

गुंजन चौक, पुणे येथे पिस्टल विक्रीसाठी आलेला सराईत गुन्हेगार येरवडा पोलिसांनी पकडला

रिपोर्टर : झोहेब शेख

पुणे, दि. २५ जून २०२५ – येरवडा पोलिसांनी बेकायदेशीर पिस्टल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक करत एक पिस्टल व दोन जिवंत राऊंडसह एकूण ३१,००० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. गुन्हेगारी नियंत्रणासाठी करण्यात आलेल्या या कारवाईमुळे पोलिसांची तत्परता पुन्हा अधोरेखित झाली आहे.

पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या सूचनेनुसार, पुणे शहरात अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात विशेष मोहिम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत येरवडा पोलीस स्टेशनच्या गुन्हे तपास पथकाने ही यशस्वी कारवाई केली.

तपास पथकातील पोलीस अंमलदार अमोल गायकवाड व विशाल निलख यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की गुंजन चौक, येरवडा येथे एक इसम पिस्टल विक्रीसाठी येणार आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे प्रभारी पोउनि प्रदिप सुर्वे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने गुंजन चौक परिसरात सापळा रचला. काही वेळातच संशयित इसम त्या ठिकाणी आल्याचे दिसून आले. पोलिसांनी त्याला पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना शिताफीने अटक केली.

अटक करण्यात आलेल्या इसमाचे नाव सोप्या सरकार उर्फ सोपान रामेश्वर सावंत (वय २३, रा. गांधन खिळा वस्ती, फुरसुंगी, ता. हवेली, जि. पुणे) असे असून, त्याच्याकडून १ देशी बनावटीची पिस्टल व २ जिवंत राऊंड जप्त करण्यात आले. या प्रकरणी येरवडा पोलीस स्टेशन येथे भारतीय हत्यार कायदा कलम ३(२५) तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम ३७(१) सह १३५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर कारवाई पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव, सहा. पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे, वरीष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र शेळके व पोनि पल्लवी मेहेर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि रविकांत नंदनवार, पोउनि प्रदिप सुर्वे, पोहवा शिंदे, गवळी, तसेच पोलीस अंमलदार गायकवाड, निलख, वाबळे, जायभाय, सोगे, कांबळे व सुतार यांनी केली.

Do‑follow Links:
Instagram: https://www.instagram.com/newsdotz/
YouTube: https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook: https://www.facebook.com/profile.php?id=61573903448264
Twitter: https://x.com/NewsDotz

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed