पुणे श्रमिक पत्रकार संघ निवडणूक 2025-26 : अध्यक्षपदी ब्रिजमोहन पाटील, सरचिटणीस मंगेश फल्ले

पुणे श्रमिक पत्रकार संघ निवडणूक 2025-26
पुणे श्रमिक पत्रकार संघ निवडणूक 2025–26 चे निकाल जाहीर; ब्रिजमोहन पाटील अध्यक्ष, मंगेश फल्ले सरचिटणीस, दिलीप तायडे खजिनदारपदी.
सायली मेमाणे
पुणे 30 जून २०२५ : पुणे : पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या 2025–26 या वर्षासाठीच्या निवडणुकीत सकाळचे ज्येष्ठ पत्रकार ब्रिजमोहन पाटील अध्यक्षपदी विजयी झाले आहेत. दिव्य मराठीचे मंगेश फल्ले सरचिटणीसपदी, तर केसरीचे दिलीप तायडे खजिनदारपदी निवडून आले आहेत. ही निवड पत्रकार बांधवांच्या एकत्रित पाठिंब्याने पार पडली असून, संघाच्या कार्यकारिणीत विविध माध्यम संस्थांचे प्रतिनिधी सहभागी झाले आहेत.
संघाचे उपाध्यक्ष म्हणून महाराष्ट्र टाइम्सचे राजा गायकवाड आणि साम टीव्हीचे सागर आव्हाड यांची निवड झाली आहे. चिटणीसपदी तनिष्का डोंगरे (सकाळ) आणि निलेश चौधरी (पुण्यनगरी) यांची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे.
नवीन कार्यकारिणीतील सदस्य पुढीलप्रमाणे आहेत:
- लक्ष्मण खोत (दैनिक भास्कर)
- राजाराम पवार (सामना)
- दत्ता अढागळे (सामना)
- अतुल चिंचली (लोकमत)
- नरेंद्र साठे (सकाळ)
- आशिष देशमुख (पुढारी)
- समीर सय्यद (नवभारत)
- विक्रांत कुलकर्णी (प्रभात)
- तेजस टवलारकर (महाराष्ट्र टाइम्स)
- सज्जाद सय्यद (ई मराठी)
या नविन कार्यकारिणीने पत्रकारांचे हक्क, स्वातंत्र्य आणि सामाजिक सुरक्षेसाठी ठोस कामगिरी करण्याचा निर्धार केला आहे. संघटनात्मक ताकद वाढवून पत्रकारांच्या प्रश्नांसाठी अधिक सक्रिय भूमिका घेण्याचे संकेत या नव्या नेतृत्वाने दिले आहेत.
पत्रकार संघटनेच्या निवडणुकीत सहकार्य करणाऱ्या सर्व सदस्यांचे अध्यक्ष ब्रिजमोहन पाटील यांनी आभार मानले असून, पत्रकारांमध्ये समन्वय, सशक्तता आणि संघभावना निर्माण करण्यासाठी संघ काम करेल असे स्पष्ट केले आहे.
Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter