पुण्यात बालवेश्याव्यवसायावर पोलिसांचा दणका – कुंटणखाना तीन वर्षांसाठी सील

0
पुण्यात बालवेश्याव्यवसायावर पोलिसांचा दणका – कुंटणखाना तीन वर्षांसाठी सील

पुण्यात बालवेश्याव्यवसायावर पोलिसांचा दणका – कुंटणखाना तीन वर्षांसाठी सील

फरासखाना पोलिसांची कारवाई – बांग्लादेशी अल्पवयीन मुलीकडून जबरदस्तीने वेश्याव्यवसाय, दोन महिलांना अटक, कुंटणखाना 3 वर्षांसाठी सील

रिपोर्टर : झोहेब शेख

पुणे २९ जुलै २०२५ : पुणे शहरातील फरासखाना पोलिसांनी अनैतिक मानवी तस्करी आणि बालवेश्याव्यवसायाला आळा घालण्यासाठी महत्त्वपूर्ण कारवाई करत बुधवार पेठेतील एका कुंटणखान्यावर छापा टाकला. बांग्लादेशी अल्पवयीन मुलीकडून जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करून घेतल्याप्रकरणी दोन महिलांना अटक करण्यात आली असून, संबंधित स्थळ पुढील तीन वर्षांसाठी सील करण्यात आले आहे.

पोलिस आयुक्त श्री. अमितेश कुमार यांच्या “नो टॉलरन्स” धोरणानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे बबिता मोहम्मद शबीर शेख (वय 61, मॅनेजर) आणि चंपा उर्फ विष्णुमाया दिनेश लामा (वय 51, कुंटणखाना चालक, मूळ नेपाळ) अशी आहेत. यांच्याविरुद्ध फरासखाना पोलीस ठाण्यात बीएनएस कलम 144, 96, 98, 99, 3(5), 351(2), 115(2), 127(4), 137(2), 64, 49 आणि पोक्सो कायद्यांतर्गत तसेच अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध अधिनियम 1956 च्या कलम 3, 4, 5, 6, 7 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी आरोपींकडून अल्पवयीन मुलींना धमकावून वेश्याव्यवसायासाठी भाग पाडल्याचे उघड झाले असून, हे गंभीर गुन्हे मानवी हक्कांचे उल्लंघन करणारे आहेत. त्यावर कठोर कारवाई आवश्यक असल्याचे स्पष्ट करत वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे यांनी मा. पोलीस आयुक्तांकडे संबंधित स्थळ सील करण्याचा प्रस्ताव पाठवला होता.

प्रकरणाची गंभीरता ओळखून मा. पोलीस आयुक्त तथा अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी श्री. अमितेश कुमार यांनी संपूर्ण सुनावणी करून बुधवार पेठेतील फ्लॅट नं. 18/ए, तिसरा मजला, नवीन इमारत, सी.एस. नं. 994 या पत्त्यावर असलेले कुंटणखाना पुढील 3 वर्षांसाठी सील करण्याचे आदेश जारी केले. हे ठिकाण दिनांक 28 जुलै 2025 रोजी अधिकृतपणे सीलबंद करण्यात आले.

ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक उत्तम नामवाडे, अजित जाधव, सहायक पोलीस निरीक्षक वैशव गायकवाड आणि इतर पोलीस कर्मचाऱ्यांच्या पथकाने पार पाडली. तसेच, या कारवाईसाठी मा. अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, मा. उप पोलीस आयुक्त कृषिकेश रावले, आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांचे सक्रिय मार्गदर्शन लाभले.

ही कारवाई पुणे पोलिसांच्या समाजविरोधी घटकांविरोधातील कठोर भूमिकेचे उदाहरण ठरते. अनैतिक मानवी व्यापार आणि बालवेश्याव्यवसाय यासारख्या गुन्ह्यांवर पोलिस प्रशासन कुठलाही संधिग्ध दृष्टिकोन ठेवणार नाही, याची खात्री या कारवाईतून पुन्हा एकदा पटली आहे.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed