विम्बल्डनमध्ये अवनीत कौरचा एलिगंट लुक सोशल मीडियावर व्हायरल, विराट-अनुष्काच्या उपस्थितीवर नेटकऱ्यांचे मिश्कील कमेंट्स

0
विराट-अनुष्काच्या उपस्थितीवर नेटकऱ्यांचे मिश्कील कमेंट्स

विराट-अनुष्काच्या उपस्थितीवर नेटकऱ्यांचे मिश्कील कमेंट्स

अवनीत कौरचा विम्बल्डनमधील एलिगंट लुक व्हायरल, विराट-अनुष्काच्या गंभीर चेहऱ्यांवर युजर्सची मजेशीर प्रतिक्रिया

सायली मेमाणे

लंडन १० जुलै २०२५ : जगप्रसिद्ध टेनिस स्पर्धा विम्बल्डन 2025 सध्या ग्लॅमर आणि स्टार्सच्या गर्दीने भरलेली आहे. याच दरम्यान, बॉलिवूड अभिनेत्री अवनीत कौर आपल्या सुपर ग्लॅम लुकमुळे चर्चेत आली आहे. तिचे स्टायलिश फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, युजर्सनी तिच्या लुकचं भरभरून कौतुक केलं आहे. विशेष म्हणजे, याच सामन्यात विराट कोहली आणि अनुष्का शर्मा हे दोघंही उपस्थित होते. मात्र, या स्टार कपलच्या चेहऱ्यावरील गंभीर भावांवरही नेटकऱ्यांनी मिश्कील प्रतिक्रिया दिल्या आहेत.

विम्बल्डनमध्ये अवनीत कौरने व्हाईट बॉडीकॉन ड्रेस, प्रिंटेड नेक स्कार्फ, स्टायलिश ब्लॅक सनग्लासेस आणि मिनिमल ज्वेलरीसह एलिगंट लुक कॅरी केला. हलका मेकअप, न्यूड टोन लिपस्टिक, माइल्ड फाउंडेशन आणि आयशॅडोमुळे तिचा चेहरा अगदी फ्रेश आणि क्लासी दिसत होता. हातावरील टॅटू आणि स्टायलिश नेल आर्टही तिच्या संपूर्ण लुकला परफेक्ट टच देत होते. तिचा हा लुक एका हाय-प्रोफाईल इव्हेंटसाठी योग्य असल्याचे युजर्सनी म्हटले.

दुसरीकडे, विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांचा फोटोही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर शेअर होत आहे. विराटने तपकिरी रंगाचा फॉर्मल कोट तर अनुष्काने पांढऱ्या रंगाचा ओव्हरसाईझ कोट परिधान केला होता. दोघंही सामना अत्यंत लक्षपूर्वक पाहताना दिसत होते. मात्र, त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा आनंदाचा उत्साह दिसून आला नाही, याकडे युजर्सने लक्ष वेधले.

सोशल मीडियावर एक युजर म्हणतो, “अनुष्काचा चेहरा बघून वाटतं ती अगदी कंटाळली आहे.” दुसरा युजर म्हणतो, “हे दोघं कंटाळलेले दिसतायत, आणि ज्यांना खरोखर विम्बल्डन पाहायचं आहे त्यांना तिकिटं मिळत नाहीत.” यावरून स्पष्ट आहे की नेटकऱ्यांनी हे फोटो मिश्कील पद्धतीने घेतले आहेत.

अवनीत कौर आणि विराट कोहली यांचं नाव याआधीही एकाच कारणामुळे चर्चेत आलं होतं. विराटने चुकून अवनीतच्या फॅनपेजवरील फोटोला ‘लाईक’ केल्याची घटना घडली होती, त्यानंतर खुद्द विराटला स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं की हे सोशल मीडियाच्या अल्गोरिदममुळे झालं. या घटनेनंतर दोघांचं नाव पुन्हा एकदा विम्बल्डनमुळे एकत्र चर्चेत आलं आहे.

अनुष्का शर्माच्या अभिनय कारकिर्दीकडे पाहिल्यास, ती सध्या चित्रपटसृष्टीपासून थोडी दूर असून आपल्या कुटुंबावर लक्ष केंद्रीत करत आहे. मात्र, तिच्या आणि विराटच्या उपस्थितीने विम्बल्डनमधील हा क्षण खास ठरला. तर, दुसरीकडे अवनीत कौरचा ग्लॅमरस लुक सोशल मीडियावर सध्या ट्रेंडिंगमध्ये आहे.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *