शिरूरमध्ये पोलिसांची मोठी कारवाई: १२ किलो गांजा आणि ₹३.५६ लाखांचा गुटखा जप्त, चार आरोपी अटकेत

शिरूरमध्ये पोलिसांची मोठी कारवाई: १२ किलो गांजा आणि ₹३.५६ लाखांचा गुटखा जप्त, चार आरोपी अटकेत
स्थानिक गुन्हे शाखेने शिरूर परिसरात तीन वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून १२ किलो गांजा आणि ₹३.५६ लाखांचा गुटखा जप्त केला. चार आरोपींना अटक, तपास सुरू.
रिपोर्टर : झोहेब शेख
पुणे २९ जुलै २०२५ : दिनांक २५ आणि २६ जुलै २०२५ रोजी स्थानिक गुन्हे शाखे पुणे ग्रामीणने शिरूर परिसरात अवैध व्यवसायांवर तिहेरी कारवाई केली. या कारवाईमध्ये एकूण १२ किलो गांजा आणि सुमारे ₹३.५६ लाख किमतीचा प्रतिबंधित गुटखा जप्त करण्यात आला. या मोहिमेत एकूण चार आरोपींना अटक करण्यात आली आहे.
पहिल्या प्रकरणात, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला आमदाबाद फाटा परिसरात गांजाची विक्री होणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर त्यांनी सापळा रचून शुभम मोहीते आणि विजय काळे या दोघांना ४.१८५ किलो गांजासह ताब्यात घेतले. संबंधितांवर एन.डी.पी.एस. कायद्यानुसार शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसऱ्या घटनेत, गुलमोहर अपार्टमेंट, बुरूड आळी येथे राहणाऱ्या रफीक शेखच्या घरातून विविध कंपन्यांच्या पानमसाला, गुटख्याचा साठा सापडला. सदर मालाची किंमत ₹३,५६,७८१/- असून त्याच्याविरुद्ध अन्न सुरक्षा अधिनियम आणि भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांखाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
तिसऱ्या प्रकरणात, रमेश उर्फ रमन खराडे याच्या मंगलमुर्ती नगर येथील घरातून ८ किलो गांजा जप्त करण्यात आला. या प्रकरणीही संबंधितांविरुद्ध शिरूर पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस. कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
या तिन्ही यशस्वी कारवायांमध्ये पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व शिरूर पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
पुणे ग्रामीण पोलीस दलाकडून अशा अवैध धंद्यांविरुद्ध सातत्याने कठोर कारवाई केली जात असून नागरिकांनी अशा प्रकारांबाबत माहिती दिल्यास कठोर कारवाई होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter