अनन्या पांडे लिप सर्जरी? फोटो व्हायरल, सुहाना खानची कमेंट, सोशल मीडियावर चर्चेचा भडका
अनन्या पांडे लिप सर्जरीनंतरचा लूक
अनन्या पांडे लिप सर्जरी : नवीन फोटोंमुळे सोशल मीडियावर लुकबाबत चर्चा, नेटकऱ्यांच्या प्रश्नांना सुहाना खानची प्रतिक्रिया, सर्जरीचा संशय.
सायली मेमाणे
पुणे १३ जून २०२५ : अनन्या पांडे लिप सर्जरीच्या चर्चेत सापडली आहे. सोशल मीडियावर अनन्याने शेअर केलेले नवीन फोटो पाहून नेटकऱ्यांनी तिला प्रश्न विचारले की तिने ओठांची सर्जरी केली आहे का? बऱ्याच युजर्सनी तिच्या नवीन लूकवर कमेंट करताना स्पष्टपणे सर्जरीचा संशय व्यक्त केला आहे. काहींनी म्हटलं की ती याआधी अधिक नैसर्गिक आणि सुंदर दिसायची. विशेष बाब म्हणजे शाहरुख खानची मुलगी सुहाना खानने सुद्धा अनन्याच्या फोटोंवर कमेंट करत ती पॉपस्टारसारखी दिसते, असं लिहिलं आहे.
बॉलिवूडमध्ये चेहऱ्याची सर्जरी, बोटॉक्स आणि इतर कॉस्मेटिक प्रोसीजर्स ही आता सामान्य बाब झाली आहे. अनेक अभिनेत्री आपली त्वचा, ओठ, नाक किंवा नितंबांचे सौंदर्य वाढवण्यासाठी सर्जरीचा वापर करताना दिसतात. त्यात आता अनन्या पांडेचे नावही चर्चेत आले आहे. तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेले फोटो पाहून अनेकजण तिच्या ओठातील बदलांकडे लक्ष वेधत आहेत.
याआधीही अनन्याला तिच्या लूकमुळे ट्रोल करण्यात आले आहे. ती म्हणाली होती की तिला बॉडी शेमिंगचा अनेक वेळा अनुभव आला आहे. ती १८-१९ वर्षांची असताना तिची चेष्टा केली जायची, “कोंबडीचे पाय”, “फ्लॅट स्क्रीन” अशा शब्दांत तिला बोललं जायचं. यामुळेच तिने स्पष्ट केले होते की कोणत्याही आकारात असले तरी महिलांवर टीका केली जाते, आणि पुरुषांबाबत तितकं बोललं जात नाही.
ती म्हणाली होती की आता लोक म्हणतात की तिची नितंबांची शस्त्रक्रिया झाली आहे. हे अनुभव तिला शिकवून गेले की सोशल मीडियावर कोणताही परिपूर्ण लूक असला तरी टीका होतेच. त्यामुळे सध्या व्हायरल होत असलेल्या या फोटोंवर अनन्याची काय प्रतिक्रिया येते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे – ती सर्जरीबद्दल काही स्पष्ट करते का की दुर्लक्ष करते, हे वेळच ठरवेल.
कामाबाबत बोलायचं झाल्यास, अनन्या पांडे सध्या बऱ्याच चित्रपटांत सक्रिय आहे. ती शेवटी ‘केसरी २’ मध्ये अक्षय कुमार आणि आर. माधवनसोबत झळकली होती. तिचे आगामी प्रोजेक्ट्स म्हणजे ‘तू मेरी, मैं तेरा’, ‘चांद मेरा दिल’ आणि ‘कॉल मी बे’चा दुसरा सीझन. त्यामुळे तिच्या वैयक्तिक लूकवरील चर्चेबरोबरच तिच्या अभिनय कारकिर्दीलाही चाहत्यांनी तेवढंच लक्ष दिलं पाहिजे.