आपल्या ग्रामपंचायतीची आर्थिक माहिती आता ‘मेरी पंचायत’ अॅपवर

भारतात ग्रामस्तरावर पारदर्शकता आणण्यासाठी केंद्र सरकारच्या पंचायत राज मंत्रालयाने 'मेरी पंचायत' नावाचा एक खास अॅप लॉन्च केला आहे.
“मेरी पंचायत” अॅपमुळे तुमच्या गावातील ग्रामपंचायतीने कोणत्या कामासाठी किती निधी वापरला, किती खर्च झाला आणि शिल्लक किती आहे – सर्व माहिती मिळवा.
सायली मेमाणे
२५ जून २०२५ : डिजिटल भारतात ग्रामस्तरावर पारदर्शकता आणण्यासाठी केंद्र सरकारच्या पंचायत राज मंत्रालयाने ‘मेरी पंचायत’ नावाचा एक खास अॅप लॉन्च केला आहे. या अॅपवर गावातील विकासकामे, निधीचा वापर, अनुदान आणि खर्चविषयक संपूर्ण आर्थिक माहिती आता घरबसल्या सहज मिळेल.
‘मेरी पंचायत’ अॅपमध्ये उपलब्ध असलेल्या महत्वाच्या सुविधांमध्ये ग्रामपंचायतीचे सदस्य आणि समित्यांची यादी, मंजूर अनुदान रक्कम, कामे सुरू आहेत का केव्हा पूर्ण, बँक खाते व खर्च-शिल्लक, तसेच पाणी योजनांची माहिती समाविष्ट आहे.
या अॅपचे एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक विकासकामासाठी मंजुरी रक्कम, खर्च व शिल्लक रक्कम यांचा ‘क्लिकमध्ये’ तपशील. त्यामुळे ग्रामस्थांना आपल्या गावातील कामकाजावर नियंत्रण ठेवता येईल .
तसेच आता गावकऱ्यांना फोटोसह कामावर अभिप्राय देण्याची सुविधा मिळाली आहे. जर कुठली कामं निकृष्ट प्रतीत झाली तर त्यांच्या अडचणींचा थेट दाखला अॅपवर त्रुटी नोंदवून करता येतो . यामुळे स्थानिक प्रशासन अधिक जबाबदार आणि उत्तरदायी होईल, अशी अपेक्षा आहे.
या अॅपचा ग्रामीण स्तरीय उपयोग:
विकासकामांमध्ये खुली चर्चा व जबाबदारी वाढ
पंचायत निधीचे संपूर्ण लेखाजोखा उपलब्ध
भ्रष्टाचार कमी होण्याची शक्यता
गावकर्यांचा प्रशासनावर वाढलेला विश्वास
Do-follow Links:
Instagram: https://www.instagram.com/newsdotz/
YouTube: https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook: https://www.facebook.com/profile.php?id=61573903448264
Twitter: https://x.com/NewsDotz