खराडी पोलीसांची कामगिरी: ३.८३ लाखांचे १५ हरवलेले मोबाईल परत, नागरीकांनी मानले आभार

0
खराडी पोलीसांची कामगिरी: ३.८३ लाखांचे १५ हरवलेले मोबाईल परत, नागरीकांनी मानले आभार

खराडी पोलीसांची कामगिरी: ३.८३ लाखांचे १५ हरवलेले मोबाईल परत, नागरीकांनी मानले आभार

खराडी पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने १५ हरवलेले मोबाईल शोधून ३.८३ लाखांची मालमत्ता नागरिकांना परत केली. नागरीकांनी दिले पोलीस दलाचे कौतुक.

रिपोर्टर : झोहेब शेख

पुणे 30 जुलै २०२५ : 📍 पुणे – खराडी पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने पुन्हा एकदा सिद्ध केले की, तांत्रिक ज्ञान आणि प्रयत्न एकत्र आल्यास हरवलेल्या वस्तूही परत मिळू शकतात. तब्बल ३ लाख ८३ हजार रुपयांच्या एकूण १५ मोबाईल फोनची यशस्वीपणे सुटका करून संबंधित नागरिकांना ते परत करण्यात आले आहेत.

या सर्व मोबाईल्स हरवले गेल्याबाबत नागरिकांनी खराडी पोलीस स्टेशनमध्ये तक्रारी दाखल केल्या होत्या. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. संजय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे विभागाचे पोलीस निरीक्षक श्री. विश्वजीत जगताप, सहायक पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र गोडसे, पोलीस उपनिरीक्षक श्री. राहुल कोळपे, तसेच सायबर तपास पथकातील अधिकारी व अंमलदारांनी संयुक्त तपास सुरु केला.

📱 या शोध मोहिमेत मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण करून, केवळ पुण्यातीलच नव्हे तर नांदेड, सोलापूर, अहिल्यानगर, उत्तर प्रदेश, कर्नाटक आणि बिहारमधील ठिकाणी सुद्धा शोधमोहीम राबविण्यात आली. विविध ब्रँडचे एकूण १५ मोबाईल्स परत मिळवण्यात तपास पथकाला यश आले.

या कामगिरीत सायबर तपास पथकातील पो.उ.नि. श्रीमती माधुरी बिडवे, पोलीस अंमलदार सुरज जाधव, महिला पोलीस अंमलदार श्रीमती प्रतिभा पवार, तसेच तपास पथकातील इतर सदस्यांचा मोलाचा वाटा होता.

🔷 सदर यशस्वी मोहिमेस मा. अपर पोलीस आयुक्त, पूर्व विभाग श्री. मनोज पाटील, पोलीस उप आयुक्त श्री. सोमय मुंडे, सहायक पोलीस आयुक्त श्रीमती प्रांजली सोनवणे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

याबाबत स्थानिक नागरिकांनी मोबाईल परत मिळाल्यामुळे आनंद व्यक्त केला असून, खराडी पोलीस स्टेशनचे विशेष कौतुक करत आभार मानले आहेत. या प्रकरणातून पोलीस दलाच्या कार्यक्षमता आणि नागरिकांप्रती असलेल्या सेवा भावनेचे दर्शन घडते.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *