गडचिरोलीत धक्कादायक प्रकार! डॉक्टरने चेकअपच्या नावाखाली तरुणीशी केले गैरवर्तन, पोलिसांकडून अटक

0
गडचिरोलीत धक्कादायक प्रकार! डॉक्टरने चेकअपच्या नावाखाली तरुणीशी केले गैरवर्तन

गडचिरोलीत धक्कादायक प्रकार! डॉक्टरने चेकअपच्या नावाखाली तरुणीशी केले गैरवर्तन

गडचिरोली जिल्ह्यातील कोरची तालुक्यात खासगी डॉक्टरने चेकअपच्या नावाखाली एका 26 वर्षीय तरुणीशी गैरवर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी डॉक्टरला अटक केली आहे.

सायली मेमाणे

गडचिरोली ३ जुलै २०२५ : गडचिरोली : डॉक्टर हा पेशा सन्माननीय मानला जातो. मात्र, गडचिरोली जिल्ह्यातील कोरची तालुक्यात एका डॉक्टरने उपचाराच्या बहाण्याने तरुणीशी गैरवर्तन करून या पेशावर काळीमा फासला आहे. ही धक्कादायक घटना बोरी गावात बुधवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास घडली. आरोपी डॉक्टर सुभाष हरप्रसाद बिश्वास (वय ४८, रा. बोरी, ता. कोरची) याच्याविरोधात बेडगाव पोलिस मदत केंद्रात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटकही करण्यात आली आहे.

छत्तीसगडमधील २६ वर्षीय पीडित तरुणी जुलाबाच्या उपचारासाठी आपल्या भावासोबत बोरी येथील सुभाष बिश्वास यांच्या खासगी दवाखान्यात आली होती. तपासणीच्या नावाखाली डॉक्टरने तिला केबिनमधील चेकअप बेडवर झोपवून तिच्याशी गैरवर्तन केले. पीडित तरुणीने आरडाओरड केल्यानंतर तिचा भाऊ केबिनमध्ये धावत आला. यावेळी डॉक्टरने त्याच्याशीही वाद घातला. यानंतर पीडितेने तत्काळ बेडगाव पोलिस मदत केंद्र गाठून तक्रार दाखल केली.

पोलिसांनी आरोपी डॉक्टरविरुद्ध विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला असून त्याला अटक केली आहे. वैद्यकीय तपासणीसाठी पीडित तरुणीला गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक वर्षा बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

दरम्यान, राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे दिसून येते. अशातच पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील भीमनगर भागात एका लहान मुलीचा विनयभंग करून तिला जातीवाचक शिविगाळ करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी आरोपी बाबा चांद शेख याला पोलिसांनी अटक केली आहे.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed