गुजरात हायकोर्टात वकीलचा धक्कादायक प्रकार; न्यायाधीशासमोर बियर प्यायलं, कोर्टाचा अवमान

0
गुजरात हायकोर्टात वकीलचा धक्कादायक प्रकार

गुजरात हायकोर्टात वकीलचा धक्कादायक प्रकार

गुजरात हायकोर्टात व्हर्च्युअल सुनावणी दरम्यान एका वकिलाने न्यायाधीशासमोरच बियर प्यायल्याचा प्रकार समोर आला. कोर्टाने हे कृत्य अवमान मानून कारवाईचा आदेश दिला आहे.

सायली मेमाणे

पुणे ४ जुलै २०२५ : गुजरात हायकोर्टात घडलेला एक विचित्र आणि धक्कादायक प्रकार सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे. २६ जून २०२५ रोजी झालेल्या एका व्हर्च्युअल सुनावणी दरम्यान, एका वरिष्ठ वकिलाने थेट न्यायाधीशांच्या समोर बियर पिताना आढळून आल्याची घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे हायकोर्टाचे न्यायाधीश संतप्त झाले असून त्यांनी या वकिलावर अवमान याचिका दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

सुनावणी सुरु असताना वकिलाच्या हातात असलेल्या कपातून ते काहीतरी पीत होते. जस्टीस संदीप भट्ट या सुनावणीचे अध्यक्षस्थानी होते. वकिलाच्या हातातील कपातील द्रव हे बियर असल्याचे स्पष्ट होताच कोर्टाने तत्काळ दखल घेतली. न्यायाधीश ए. एस. सुपाहिया आणि आर. टी. वछवानी यांनी हे वर्तन कोर्टाचा सरळ सरळ अवमान मानत पुढील आदेश येईपर्यंत त्या वकिलास सुनावणीस उपस्थित राहण्यास मनाई केली.

यासोबतच रजिस्ट्रारला त्या वकिलाविरोधात अवमान याचिका दाखल करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. तसेच न्यायालयाने संबंधित वकिलाच्या पदवीचा पुनर्विचार करण्याचा सल्लाही दिला आहे. हा प्रकार कोर्टाच्या शिस्त आणि प्रतिष्ठेवर थेट आघात करणारा असून कायद्यातील जबाबदारीचे गांभीर्य दाखवणारा ठरतो.

हायकोर्टात घडलेली ही पहिलीच विचित्र घटना नाही. याआधी २० जून रोजी झालेल्या सुनावणी दरम्यान, ‘समद बॅटरी’ नावाने लॉग इन केलेल्या एका व्यक्तीने थेट टॉयलेटमध्ये बसून ऑनलाइन हिअरिंग अटेंड केल्याचा प्रकार समोर आला होता. या व्यक्तीने टॉयलेट सीटवर बसून मोबाईल कॅमेरा ऑन केला आणि सुनावणीस सामील झाला. हे दृश्य सर्व न्यायाधीश आणि इतर वकिलांच्या स्क्रीनवर झळकले. या व्हिडिओने सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला होता.

या घटना पाहता, ऑनलाइन कोर्ट सुनावणी दरम्यान शिस्तीचा अभाव गंभीर प्रश्न निर्माण करत आहे. हायकोर्टासारख्या प्रतिष्ठित संस्थेत अशा घटना घडणे हे न्याय व्यवस्थेच्या गंभीरतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करते. अशा घटनांमुळे व्हर्च्युअल कोर्ट प्रक्रियेतील शिस्त आणि विश्वासार्हतेवर आघात होतो.

सरतेशेवटी, या प्रकारांमुळे न्यायालयीन कामकाजात अधिक काटेकोर नियम आणि अनुशासनबद्ध वर्तनाची गरज अधोरेखित होते. गुजरात हायकोर्टाने घेतलेली कारवाई हे इतर वकिलांसाठी आणि सामान्य नागरिकांसाठी एक चेतावणी ठरू शकते की न्यायालयाचा अपमान सहन केला जाणार नाही.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed