चिंचवड संपादरम्यान कामगाराच्या मृत्यूनंतर एक्झाइड इंडस्ट्रीजवरचे आरोप फेटाळले

0
चिंचवड संपादरम्यान कामगाराच्या मृत्यूनंतर एक्झाइड इंडस्ट्रीजवरचे आरोप फेटाळले

चिंचवड संपादरम्यान कामगाराच्या मृत्यूनंतर एक्झाइड इंडस्ट्रीजवरचे आरोप फेटाळले


व्यवस्थापनावरील सर्व आरोप “बिनबुडाचे आणि कंपनीची बदनामी करणारे” असल्याचे एक्झाईडने स्पष्ट केले.

पुणे, ३० ऑगस्ट – चिंचवड येथील एक्साइड इंडस्ट्रीजमध्ये सुरू असलेल्या संपादरम्यान विलास प्रल्हाद पोल (५५) यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याने औद्योगिक वसाहतीत खळबळ माजली आहे. २५ ऑगस्टपासून सुरू असलेला हा संप साडेतीन वर्षांपासून सुरू असलेल्या कामगार-व्यवस्थापन वादाचा भाग आहे.

घटनेनंतर कामगारांनी कंपनीवर अन्यायकारक कारवायांचा आरोप केला. यात ३१ कर्मचाऱ्यांची सेवामुक्ती, ४२ जणांना सक्तीने राजीनामे द्यायला लावणे, युनियनच्या कामकाजात हस्तक्षेप करणे आणि प्रतिकूल वेतन अटी लादणे असे आरोप आहेत. पोल यांचा मृतदेह यशवंतराव चव्हाण रुग्णालयात नेण्यात आला असून, मोठ्या संख्येने कामगार तेथे जमले होते. त्यांनी तातडीने सरकारी हस्तक्षेपाची मागणी केली.

मात्र, एक्साइड इंडस्ट्रीज लिमिटेडने अधिकृत निवेदन जारी करून हे सर्व आरोप फेटाळून लावले. कंपनीने स्पष्ट केले की, व्यवसायातील धोरणात्मक पुनर्बांधणी अंतर्गत मोटरसायकल बॅटरी निर्मिती आळेफाटा (अहिल्यानगर, महाराष्ट्र) आणि बावल (हरियाणा) येथील प्रकल्पात एकत्रित करण्यात आली. चिंचवडमधून दहा कामगारांना बावल प्रकल्पात बदली करण्यात आले होते. संबंधित कर्मचाऱ्यांनी याविरोधात न्यायालयात दाद मागितली होती. मात्र औद्योगिक न्यायालय, मुंबई उच्च न्यायालय तसेच सर्वोच्च न्यायालयानेही त्यांच्या मागणीस तात्पुरता दिलासा नाकारला होता.

कंपनीने पुढे म्हटले की, कामगारांना आळेफाटा येथे पुनर्नियुक्तीची संधी तसेच नुकसानभरपाईचे पर्याय दिले होते. अनेक वेळा चर्चाही घेण्यात आल्या, परंतु संबंधित कामगारांनी प्रस्ताव स्वीकारले नाहीत. “कामगारांना जबरदस्तीने राजीनामे दिले, मोठ्या प्रमाणात सेवामुक्ती केली, हे सर्व आरोप निराधार असून केवळ कंपनीची प्रतिमा मलिन करण्यासाठी केलेले आहेत,” असे एक्साइडने स्पष्ट केले.

दरम्यान, गेल्या डिसेंबर २०२४ मध्येही अशाच प्रकारे एका कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्यामुळे या वादाला आणखी तीव्र वळण मिळाले असून, कामगार संघटनांनी तातडीने सरकारने हस्तक्षेप करावा, अशी मागणी केली आहे.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *