दिल्ली हादरली! आर्मी ऑफिसर असल्याचं सांगून महिला डॉक्टरवर अत्याचार; आरोपी निघाला डिलिव्हरी बॉय

0
दिल्ली हादरली! आर्मी ऑफिसर असल्याचं सांगून महिला डॉक्टरवर अत्याचार; आरोपी निघाला डिलिव्हरी बॉय

दिल्ली हादरली! आर्मी ऑफिसर असल्याचं सांगून महिला डॉक्टरवर अत्याचार; आरोपी निघाला डिलिव्हरी बॉय

दिल्लीतील धक्कादायक प्रकरणात आर्मी लेफ्टनंट असल्याचं सांगणाऱ्या तरुणाने सफदरजंग रुग्णालयातील महिला डॉक्टरची फसवणूक करून बलात्कार केला. आरोपी नंतर डिलिव्हरी बॉय असल्याचं समोर आलं आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.


सायली मेमाणे

पुणे २७ ऑक्टोबर २०२५ : दिल्लीमध्ये घडलेल्या एका धक्कादायक प्रकरणाने संपूर्ण देश हादरला आहे. भारतीय सैन्यात लेफ्टनंट असल्याचं सांगणाऱ्या एका तरुणाने महिला डॉक्टरला फसवून तिच्यावर बलात्कार केला आहे. हा प्रकार सफदरजंग रुग्णालयातील डॉक्टरसोबत घडला असून, आरोपीचं नाव आरव असं सांगितलं जात आहे. आरोपी मूळचा दिल्लीच्या छतरपूर परिसरातील रहिवासी असून, प्रत्यक्षात तो एक डिलिव्हरी बॉय असल्याचं तपासातून स्पष्ट झालं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी आणि पीडित महिला डॉक्टर यांची ओळख सोशल मीडियावर — विशेषतः इन्स्टाग्रामवर झाली. तेथून दोघांमध्ये संवाद सुरू झाला आणि नंतर व्हॉट्सअॅपवर चॅटिंग सुरू राहिली. आरोपीने स्वत:ला भारतीय सैन्याचा लेफ्टनंट म्हणून ओळख करून दिली. त्याने काश्मिरमध्ये पोस्टिंग असल्याचं सांगून महिला डॉक्टरचा विश्वास संपादन केला. त्याचबरोबर, सैन्याचा गणवेश घातलेला फोटो डॉक्टरला पाठवून त्याने आपली ओळख खरी असल्याचं दाखवण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, ऑक्टोबर २०२५ मध्ये आरोपी डॉक्टरला भेटण्यासाठी तिच्या घरी गेला. या भेटीदरम्यान आरोपीने खाण्याच्या पदार्थात नशेचं औषध मिसळलं. डॉक्टरची शुद्ध हरपल्यानंतर त्याने तिच्यावर बलात्कार केला आणि त्यानंतर तेथून फरार झाला. पीडित डॉक्टर शुद्धीवर आल्यानंतर तिला घडलेला प्रकार लक्षात आला. त्यानंतर १६ ऑक्टोबर रोजी तिने दिल्ली पोलिसांकडे तक्रार दाखल केली.

या तक्रारीनंतर पोलिसांनी त्वरीत कारवाई करत आरोपीला अटक केली. तपासादरम्यान समोर आलं की, आरोपीने सैन्याचा गणवेश ऑनलाईन खरेदी केला होता. तो दिल्लीतील एका खासगी कंपनीत डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत होता. चौकशीत त्याने आपले गुन्हे कबूल केले असून, महिला डॉक्टरसोबत फसवणुकीच्या उद्देशाने सैन्याची ओळख वापरल्याचं सांगितलं.

या घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रातील महिला डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. सोशल मीडियावरून ओळखी वाढवण्याबाबत तज्ज्ञांनी नागरिकांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे. दिल्ली पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असून, आरोपीविरुद्ध बलात्कार, फसवणूक आणि ओळख बनावट दाखवण्याचे गंभीर गुन्हे नोंदवले आहेत.

दरम्यान, महाराष्ट्रातील साताऱ्यातील फलटण येथे काही दिवसांपूर्वी अशाच प्रकारातील महिला डॉक्टरने आत्महत्या केल्याचं वृत्त समोर आलं होतं. त्या घटनेत सुसाइड नोटमध्ये डॉक्टरवर चार वेळा बलात्कार झाल्याचा उल्लेख होता. त्यामुळे देशभरात महिलांच्या सुरक्षेबाबत पुन्हा एकदा गंभीर चर्चा सुरू झाली आहे.

या सर्व घटनांनी महिला सुरक्षेच्या प्रश्नाला पुन्हा अधोरेखित केलं आहे. ऑनलाइन ओळखीतून होणाऱ्या फसवणुकीच्या घटनांमध्ये सतत वाढ होत आहे आणि अशा घटनांना आळा घालण्यासाठी कायदा अधिक कठोर होण्याची गरज असल्याचं मत महिला कार्यकर्त्यांनी व्यक्त केलं आहे.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed