नवी मुंबईत रोहित पवार आक्रमक: सत्तेशी तडजोड नाही, गरीबांसाठी लढणार निर्धार

0
नवी मुंबईत रोहित पवार आक्रमक: सत्तेशी तडजोड नाही, गरीबांसाठी लढणार निर्धार

नवी मुंबईत रोहित पवार आक्रमक: सत्तेशी तडजोड नाही, गरीबांसाठी लढणार निर्धार

नवी मुंबईत रोहित पवार यांनी भ्रष्टाचार आणि गैरव्यवहारांवर टीका करत सत्तेशी कधीही तडजोड न करण्याचा निर्धार व्यक्त केला. गरीब व सामान्य जनतेसाठी लढा देत राहण्याची घोषणा.

सायली मेमाणे

पुणे २१ ऑगस्ट २०२५ : नवी मुंबई |
नवी मुंबई परिसरातील जागेविषयी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार आक्रमक झाले. त्यांनी थेट सत्ताधाऱ्यांना लक्ष्य करत भ्रष्टाचार, गैरव्यवहार आणि गरीबांच्या कल्याणकारी योजनांचा पैसा हडप करणाऱ्यांना इशारा दिला.

रोहित पवार म्हणाले की, “सत्तेशी पंगा घेतला तर त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतात. पण गरीबांच्या हितासाठी, जनतेच्या पैशांसाठी आणि न्यायासाठी आम्ही कुठल्याही परिस्थितीत झुकणार नाही. भ्रष्टाचार सहन केला जाणार नाही.”

त्यांनी हेही स्पष्ट केले की निवडणुकीत विरोधकांनी सत्तेची सर्व ताकद लावली, तरीही जनता त्यांच्यासोबत ठामपणे उभी राहिली. “मी निवडून आलो तो फक्त जनतेचा आवाज उठवण्यासाठीच. गरीब, सामान्य आणि शेतकरी वर्गासाठी लढणे हेच माझे ध्येय आहे,” असे ते म्हणाले.

पुढे त्यांनी जोर दिला की, “आम्ही सत्तेशी कधीही तडजोड करणार नाही. अन्याय आणि गैरव्यवहारांविरोधात सतत आवाज उठवत राहू. शेवटी, मराठी माणूस कधीही दिल्लीपुढं झुकत नाही.”

रोहित पवार यांच्या या ठाम भूमिकेमुळे नवी मुंबई परिसरातील राजकारणात चांगलीच चर्चा रंगली आहे.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed