नाशिक EOW कडून शिक्षकांच्या बोगस भरती प्रकरणी गुन्हा, जळगावात चौकशी सुरू

0
नाशिक EOW कडून शिक्षकांच्या बोगस भरती प्रकरणी गुन्हा, जळगावात चौकशी सुरू

नाशिक EOW कडून शिक्षकांच्या बोगस भरती प्रकरणी गुन्हा, जळगावात चौकशी सुरू

जळगाव जिल्ह्यात बोगस शालार्थ आयडीद्वारे ५० शिक्षकांची नियुक्ती झाल्याचे उघड; नाशिक EOW ने गुन्हा दाखल करून जळगावात चौकशी सुरू केली.

सायली मेमाणे

पुणे २५ ऑगस्ट २०२५ : जळगाव | जिल्ह्यात बोगस शालार्थ आयडी तयार करून सुमारे ५० शिक्षकांची बोगस भरती करण्यात आल्याचे धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे. या प्रकरणी नाशिक येथील आर्थिक गुन्हे शाखेत (EOW) गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपासाची सूत्रे हाती घेण्यासाठी नाशिक EOW चे विशेष पथक आज (शुक्रवारी) जळगावात दाखल झाले आहे.

पाच अधिकाऱ्यांचा व कर्मचाऱ्यांचा तपास पथक जिल्हा परिषदेतील माध्यमिक शिक्षण अधिकाऱ्यांच्या दालनात बंद दार चौकशी करत आहे. यामध्ये नोंदी, भरती प्रक्रियेतील कागदपत्रे व शाळांच्या याद्या तपासल्या जात आहेत.

ज्या शाळांमध्ये बोगस शालार्थ आयडीचा वापर करून शिक्षकांची भरती झाली, त्या शाळांचे मुख्याध्यापकांना चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. संबंधितांकडून संपूर्ण प्रक्रिया कशी पार पडली, याबाबत विचारपूस सुरू आहे.

अनेक जिल्ह्यांमध्ये शालेय शिक्षण विभागात अनियमितता झाल्याच्या तक्रारी येत असताना, जळगाव जिल्ह्यातील या प्रकरणाने मोठे वळण घेतले आहे. सुमारे ५० शिक्षकांची नियुक्ती बोगस कागदपत्रांच्या आधारे झाल्याचा आरोप आहे.

या तपासामुळे जिल्हा परिषदेतील शिक्षण विभागातील कारभारावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. पुढील काही दिवसांत तपासातून महत्त्वाचे धागेदोरे समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *