पुणे गुन्हा: व्हॉट्सअॅप कॉलवरून ५० लाखांची खंडणी, दिली नाही तर मर्डरची धमकी

0
पुणे गुन्हा: व्हॉट्सअॅप कॉलवरून ५० लाखांची खंडणी, दिली नाही तर मर्डरची धमकी

पुणे गुन्हा: व्हॉट्सअॅप कॉलवरून ५० लाखांची खंडणी, दिली नाही तर मर्डरची धमकी

पुण्यात व्हॉट्सअॅप कॉलवरून ५० लाखांची खंडणी मागणाऱ्या अज्ञात आरोपीस मुंढवा पोलिसांनी अटक केली. धमकी देत “तू खूप पैसा कमवला, पैसे नाही दिले तर मर्डर करेन” असे म्हणत धमकी दिली होती.

सायली मेमाणे

पुणे १ ऑगस्ट २०२५ : पुण्यात पुन्हा एकदा खंडणीसाठी धमकी देण्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. मुंढवा परिसरात एका व्यावसायिकाला व्हॉट्सअॅप कॉलवरून अज्ञात इसमाने ५० लाख रुपयांची खंडणी मागितली. “तू खूप पैसा कमवला आहेस, मला ५० लाख रुपये खंडणी दे, नाहीतर तुझा खून करीन” अशी धमकी देत आरोपीने फिर्यादीला मानसिक त्रास दिला. ही घटना २६ ते २९ जुलैदरम्यान घडली असून, पीडिताने पोलिसांकडे तक्रार दाखल करताच गुन्हा नोंदवण्यात आला.

मुंढवा पोलिसांनी तात्काळ कारवाई करत सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू महानोर यांच्या नेतृत्वाखालील विशेष पथकाला तपासाची जबाबदारी दिली. आरोपी सतत मोबाईल बंद करून ठिकाण बदलत होता. परंतु, पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपीचा मागोवा घेतला आणि तो घोरपडी परिसरात येणार असल्याची माहिती मिळवत सापळा रचला.

बुधवारी रात्री साडेनऊ वाजता पोलीस अंमलदार अक्षय धुमाळ आणि स्वप्नील रासकर यांनी संयुक्त कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले. आरोपीविरोधात खंडणी आणि धमकी यासारखे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक माया देवरे, पोलीस निरीक्षक बाबासाहेब निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. तपासात सहा. पोलीस निरीक्षक राजू महानोर, युवराज पोमण, राजू कदम, विनोद सांळुके, शिवाजी जाधव, राहुल धोत्रे, योगेश गायकवाड, राहुल मोरे, शिवाजी धांडे, अक्षय धुमाळ, स्वप्नील रासकर, रुपेश तोडकर आणि योगेश राऊत यांच्या पथकाचा मोलाचा वाटा होता.

या प्रकारामुळे शहरात पुन्हा एकदा खंडणी आणि सायबर गुन्ह्यांची गंभीरता अधोरेखित झाली असून, पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत नागरिकांमध्ये विश्वास निर्माण केला आहे.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *