पुणे: घराची किंमत 90 लाख पण मिळणार फक्त 28 लाखात! म्हाडाची सुवर्णसंधी, अर्ज कसा करायचा जाणून घ्या

0
पुणे: घराची किंमत 90 लाख पण मिळणार फक्त 28 लाखात! म्हाडाची सुवर्णसंधी, अर्ज कसा करायचा जाणून घ्या

पुणे: घराची किंमत 90 लाख पण मिळणार फक्त 28 लाखात! म्हाडाची सुवर्णसंधी, अर्ज कसा करायचा जाणून घ्या

पुण्यात वाकड परिसरात म्हाडाकडून फक्त ₹28.42 लाखांपासून घर मिळवण्याची सुवर्णसंधी. “Pune Board Lottery 2025” अंतर्गत 2BHK आणि 3BHK फ्लॅटसाठी अर्ज प्रक्रिया सुरू; अंतिम तारीख 20 नोव्हेंबर 2025.

सायली मेमाणे

पुणे २ ऑक्टोबर २०२५ : पुणे : वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांसाठी घर घेणे आता अधिकच अवघड होत चालले आहे. विशेषतः पुण्यासारख्या महानगरात स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण करणे हे अनेक मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी अशक्यप्राय बनले आहे. मात्र, महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाने (MHADA) पुणेकरांसाठी एक मोठी सुवर्णसंधी उपलब्ध करून दिली आहे. म्हाडाच्या नव्या गृहलॉटरी योजनेअंतर्गत पुण्यातील वाकड परिसरात अत्यंत परवडणाऱ्या दरात घरे उपलब्ध करण्यात आली आहेत.

या योजनेत म्हाडाने “यश्विन अर्बो सेंट्रो” (Yashwin Urbo Centro) या खासगी गृहनिर्माण प्रकल्पातील 28 घरे लॉटरीसाठी राखीव ठेवली आहेत. हा प्रकल्प भूमकर चौकाजवळ, इंदिरा गांधी कॉलेजच्या परिसरात आणि मुख्य हायवे लगत असलेल्या वाकडमध्ये आहे. प्रसिद्ध विलास जावळकर ग्रुपकडून हा प्रकल्प विकसित करण्यात आला आहे. प्रकल्पाची लोकेशन, हायवे टच कनेक्टिव्हिटी आणि विकसित नागरी सुविधा लक्षात घेता, ही घरे सर्वसामान्य नागरिकांसाठी अत्यंत आकर्षक ठरत आहेत.

या लॉटरी अंतर्गत उपलब्ध घरांचा कार्पेट एरिया अंदाजे 500 ते 600 स्क्वेअर फूट इतका आहे. या 2BHK आणि 3BHK फ्लॅट्सची किंमत फक्त ₹28.42 लाख ते ₹28.74 लाख इतकी ठेवण्यात आली आहे. याच परिसरात खासगी प्रकल्पांमधील अशाच प्रकारच्या घरांची किंमत तब्बल ₹80 लाख ते ₹90 लाख इतकी आहे. त्यामुळे म्हाडाच्या माध्यमातून घर घेणाऱ्यांची सुमारे ₹60 लाखांहून अधिक बचत होणार आहे.

विकसित भागात इतक्या कमी किमतीत घर मिळणे ही एक दुर्मिळ संधी मानली जात आहे. या योजनेतून पुण्यातील अनेक मध्यमवर्गीय कुटुंबांना स्वप्नातील घर मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. म्हाडा प्रशासनाने सांगितले की, अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन आणि पारदर्शक ठेवण्यात आली आहे.

अर्जदारांनी https://lottery.mhada.gov.in या म्हाडाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी. त्यानंतर “Pune Board Lottery 2025” हा पर्याय निवडून अर्ज भरता येईल. अर्ज प्रक्रिया अत्यंत सोपी असून, अर्जदारांना आवश्यक कागदपत्रे अपलोड करून ऑनलाइन पेमेंट करता येणार आहे.

या लॉटरीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 20 नोव्हेंबर 2025 रात्री 11.59 वाजेपर्यंत निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे इच्छुकांनी अंतिम तारखेपूर्वी अर्ज प्रक्रिया पूर्ण करणे अत्यावश्यक आहे. म्हाडाने पात्र अर्जदारांना मुदतीपूर्वी अर्ज पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे.

राज्यातील गृहनिर्माण क्षेत्रात म्हाडा ही सर्वसामान्यांसाठी सर्वाधिक विश्वासार्ह संस्था मानली जाते. या योजनेमुळे पुन्हा एकदा म्हाडाने गृहप्रकल्पांद्वारे मध्यमवर्गीय नागरिकांना परवडणाऱ्या घरांचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. पुणे शहरातील या नव्या गृहयोजनेमुळे हजारो कुटुंबांना आपले स्वतःचे घर मिळण्याचे स्वप्न पूर्णत्वास येण्याची शक्यता आहे.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *