पुण्यातील वाहतूक सुधारण्यासाठी ३० वर्षांचा कॉम्प्रेहेन्सिव्ह मोबिलिटी प्लॅन; CM फडणवीसांची घोषणा

0
पुण्यातील वाहतूक सुधारण्यासाठी ३० वर्षांचा कॉम्प्रेहेन्सिव्ह मोबिलिटी प्लॅन; CM फडणवीसांची घोषणा

पुण्यातील वाहतूक सुधारण्यासाठी ३० वर्षांचा कॉम्प्रेहेन्सिव्ह मोबिलिटी प्लॅन; CM फडणवीसांची घोषणा

पुणे शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ३० वर्षांचा कॉम्प्रेहेन्सिव्ह मोबिलिटी प्लॅन जाहीर केला. रिंगरोड, भुयारी मार्ग, मेट्रो, बससेवा विस्तारासह सार्वजनिक वाहतूक ५०% पर्यंत नेण्याचे उद्दिष्ट.

सायली मेमाणे

पुणे ११ ऑगस्ट २०२५ : पुणे शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीला आळा घालण्यासाठी आणि नागरिकांना सुलभ प्रवास सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ३० वर्षांचा कॉम्प्रेहेन्सिव्ह मोबिलिटी प्लॅन (CMP) तयार करण्यात आला आहे. यामध्ये रिंगरोड, भुयारी मार्ग, मेट्रो, बससेवा विस्तार, ग्रेड सेपरेटर यांसारख्या मोठ्या प्रकल्पांचा समावेश आहे. या योजनेची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यशदा येथे झालेल्या कार्यशाळेनंतर पत्रकारांशी बोलताना केली.

सध्याची वाहतूक परिस्थिती चिंताजनक

पुणे महापालिका आयुक्त आणि पुणे पोलीस आयुक्तांनी दिलेल्या सादरीकरणानुसार, सध्या पुण्यात वाहतुकीचा वेग सरासरी १९ किमी प्रतितास असून, काही वेळा तो फक्त १२ किमी प्रतितास इतकाच राहतो. महानगरात वाहतुकीचा आदर्श वेग ३० किमी प्रतितास असावा, यासाठी २०२६ च्या डिसेंबरपर्यंत विविध उपाययोजना राबवण्याचे नियोजन आहे.

भुयारी मार्गांचे नेटवर्क

मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, सध्या पुणे शहरात फक्त ६% रस्तेच भुयारी मार्गाच्या स्वरूपात आहेत, त्यामुळे भविष्यात या नेटवर्कचा विस्तार करणे गरजेचे आहे. यासाठी पुणे महापालिकेला विशेष सूचना देण्यात आल्या आहेत.

बससेवा आणि सार्वजनिक वाहतूक विस्तार

सध्या पुण्यात २ हजार बसेस आहेत, परंतु पुढील दोन वर्षांत या संख्येत वाढ करून ६ हजार बसेस करण्याचे नियोजन आहे. सार्वजनिक वाहतूक ३०% वरून ५०% पर्यंत नेण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, प्रत्येक नागरिकाला ५०० मीटर अंतरात सार्वजनिक वाहतूक सुविधा उपलब्ध होईल असे नियोजन आहे.

CMP ची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी

  • पहिला टप्पा: ६२ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक
  • संपूर्ण प्रकल्प खर्च: १ लाख ३० हजार कोटी रुपये
  • क्षेत्रफळ: २२०० किमी परिसर
  • तीन टप्प्यांमध्ये अंमलबजावणी
    या योजनेत पुणे महापालिका, पिंपरी चिंचवड महापालिका, पीएमआरडीए आणि राज्य सरकार यांचा समावेश असून, पुढील सर्व पायाभूत प्रकल्प CMP नुसारच राबवले जातील.

पिंपरी चिंचवडसाठी रॅपिड ट्रान्झिट

पिंपरी चिंचवड शहरातील रस्ते रुंद असल्याने येथे रॅपिड ट्रान्झिट सिस्टम उभारण्याची शक्यता आहे, असेही फडणवीस यांनी सांगितले.

या कॉम्प्रेहेन्सिव्ह मोबिलिटी प्लॅनमुळे पुण्यातील वाहतूक कोंडी कमी होऊन सार्वजनिक वाहतूक अधिक सोयीस्कर आणि जलद होण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed