पुण्यात गुन्हेगाराची डीजे पार्टी, विमाननगरमध्ये पोलीस ठाण्याच्या शेजारीच वाढदिवसाचा गोंधळ

0
पुण्यात गुन्हेगाराची डीजे पार्टी, पोलीस ठाण्याच्या शेजारी वाढदिवस साजरा

पुण्यात गुन्हेगाराची डीजे पार्टी, पोलीस ठाण्याच्या शेजारी वाढदिवस साजरा

पुण्याच्या विमाननगरमध्ये नोंदवलेल्या गुन्हेगाराने पोलीस ठाण्याच्या अगदी जवळ बर्थडे पार्टीचा डीजे गोंधळ केला. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण.

पुणे ५ ऑगस्ट २०२५ : पुणे: विद्येचं माहेरघर म्हणून ओळख असलेलं पुणे शहर सध्या गुन्हेगारीच्या घटनांमुळे चर्चेत आहे. याच दरम्यान पुण्यातील उच्चभ्रू भाग असलेल्या विमाननगर आणि कल्याणी नगरमध्ये एका गुन्हेगाराने भर पोलीस ठाण्याच्या शेजारीच वाढदिवस साजरा करत डीजे पार्टी आयोजित केली. ही घटना सोशल मीडियावर व्हायरल होत असून, नागरिकांमध्ये चिंता आणि भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

शनिवारी मध्यरात्री विमाननगरमधील दत्त मंदिर चौकात “Three Musketeers” पबच्या पार्किंगमध्ये कथित गुन्हेगार फिरोज शेख याने ही डीजे पार्टी आयोजित केली. विशेष म्हणजे, फिरोज शेखवर कलम 353 अंतर्गत गुन्हा दाखल असून तो विमानतळ पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील आरोपी आहे. तरीही पोलिसांच्या नजरेसमोरच त्याने शंभरहून अधिक युवकांसह बर्थडे पार्टी करत गोंधळ घातला.

या संपूर्ण पार्टीचे व्हिडिओ फिरोज शेखच्या साथीदार पेनटरने इंस्टाग्रामवर टाकले होते, जे नंतर व्हायरल झाले. सोशल मीडियाच्या माध्यमातून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचं चित्र यातून दिसत आहे.

ही घटना उघडकीस आल्यानंतर सामान्य नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून, प्रशासनाच्या भूमिकेबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. एका नोंदवलेल्या गुन्हेगाराकडून सार्वजनिक ठिकाणी असं खुलेआम डीजे पार्टी करणं, आणि पोलिसांची याकडे दुर्लक्ष करणं, हे धक्कादायक मानलं जात आहे.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *