पुण्यात पाणीपुरवठा कोलमडला: देखभालीनंतरही नळ कोरडे, टँकर पॉईंट बंद

0
पुण्यात पाणीपुरवठा कोलमडला: देखभालीनंतरही नळ कोरडे, टँकर पॉईंट बंद

पुण्यात पाणीपुरवठा कोलमडला: देखभालीनंतरही नळ कोरडे, टँकर पॉईंट बंद

देखभाल दुरुस्तीच्या कामांनंतरही पुण्यात अनेक भागांत पाणी न आल्याने नागरिकांची तारांबळ. टँकर पॉईंट बंद, नगरसेवकांकडून प्रशासनावर टीका; टप्प्याटप्प्याने पुरवठा सुरळीत करण्याचा दावा.

पुणे २५ एप्रिल २०२६ : देखभाल दुरुस्तीच्या कामांमुळे गुरुवारी बंद ठेवलेला पाणीपुरवठा शुक्रवारी सुरळीत होईल, असा दावा प्रशासनाकडून करण्यात आला होता. मात्र प्रत्यक्षात अनेक भागांत नळ कोरडेच राहिल्याने पुणेकरांना पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. टँकर पॉईंटही बंद असल्याने पर्यायी पाणीपुरवठ्याची सोय उपलब्ध झाली नाही. याचे तीव्र पडसाद सर्वसाधारण सभेत उमटले आणि नगरसेवकांनी प्रशासनाच्या नियोजनावर जोरदार टीका केली.

महापालिकेने सकाळी उशिरा व कमी दाबाने पाणी येईल, असे जाहीर केले होते. पण अनेक प्रभागांत पाणीच न आल्याने नागरिकांनी सकाळपासून लोकप्रतिनिधींना फोन केले. या पार्श्वभूमीवर सर्वसाधारण सभेत पाणीपुरवठ्याचा मुद्दा ऐरणीवर आला. काही नगरसेवकांनी नागरिक अक्षरशः पाण्याविना असल्याचे सांगत शुक्रवारी दिवसभर पाणी सुरू ठेवण्याची मागणी केली. मिठानगर, अश्रफनगर, कौसरबाग आणि एनआयबीएम परिसरात केवळ एक तास पाणी येत असून तेही दूषित असल्याच्या तक्रारी मांडण्यात आल्या. पाणी नसताना इमारतींना बांधकाम परवानग्या का दिल्या जातात, असा सवालही उपस्थित झाला.

नांदेड फाटा ते नंदोशी दरम्यान फक्त २० मिनिटे दूषित पाणी येत असल्याचे निदर्शनास आणत संपूर्ण पाईपलाईन बदलण्याची मागणी करण्यात आली. केशवनगर, शेवाळवाडी, मांजरी या भागांत मंजूर क्षमतेपेक्षा अत्यल्प पाणीपुरवठा होत असल्याचा आरोप करत, १२ एमएलडी मंजूर असताना केवळ ४ एमएलडी पाणी दिले जात असल्याचे सांगण्यात आले. धरणात पाणी उपलब्ध असूनही नियोजनातील त्रुटींमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याचेही मत व्यक्त झाले.

नागरिकांना पाणीपुरवठ्याबाबत वेळोवेळी एसएमएसद्वारे माहिती देण्याची मागणीही पुढे आली. सकाळपासून पाणी नाही आणि विभागाकडून स्पष्ट माहिती मिळत नाही, अशी तक्रार करत २४x७ पाणी योजनेला गती देण्याचा आग्रह धरण्यात आला. काही भागांत ५–६ दिवस पाणी येत नसल्याच्या तक्रारींसह गळती, अपूर्ण टाक्या आणि टँकर व्यवस्थेतील गोंधळावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले.

यावर पुणे महानगरपालिका पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता रामदास तारू यांनी २३ एप्रिल रोजी जलशुद्धीकरण केंद्रांवरील विद्युत कामे आणि फ्लो मीटर बसवण्यामुळे पाणीपुरवठ्यात ५–६ तास विलंब झाल्याचे सांगत दिलगिरी व्यक्त केली. पुढे अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर यांनी खुलासा करत खासगी टँकर चालकांच्या बंदमुळे क्लोजर पुढे ढकलावा लागल्याचे नमूद केले. गुरुवारी एकाचवेळी ४५ मोठी कामे सुरू होती आणि ती शुक्रवारी सकाळपर्यंत सुरू राहिल्याने पुरवठ्यावर परिणाम झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

प्रशासनाने शहरात टप्प्याटप्प्याने पाणीपुरवठा सुरळीत होईल, असा दावा केला असला तरी नागरिकांचा रोष कमी झालेला दिसत नाही. वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर पाणीपुरवठ्याचे दीर्घकालीन नियोजन, गळती रोखणे, पाईपलाईन दुरुस्ती आणि पारदर्शक माहिती देणे या बाबी तातडीने राबवण्याची गरज असल्याचे मत पुढे येत आहे. या घटनेमुळे पाणीपुरवठा व्यवस्थेतील त्रुटी पुन्हा एकदा अधोरेखित झाल्या आहेत.

Follow us on our social media handles:
Instagram – https://www.instagram.com/newsdotz/
YouTube – https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook – https://www.facebook.com/NewsDotz/

Twitter – https://x.com/NewsDotz

Also Read: Pune’s Latest Information

FacebookWhatsAppXTelegramThreadsLinkedInGmailShare

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed