बीडमध्ये रेस्पिफ्रेश कफ सिरपचा साठा जप्त; बालमृत्यूच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाची कारवाई

0
बीडमध्ये रेस्पिफ्रेश कफ सिरपचा साठा जप्त; बालमृत्यूच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाची कारवाई

बीडमध्ये रेस्पिफ्रेश कफ सिरपचा साठा जप्त; बालमृत्यूच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाची कारवाई

महाराष्ट्र शासनाने बंदी घाललेल्या रेस्पिफ्रेश कफ सिरपचा साठा बीड जिल्ह्यात जप्त. परळी, गेवराई आणि आष्टीतून 500 बाटल्या जप्त; औषध विक्रीवर बंदी.

सायली मेमाणे

पुणे १० ऑक्टोबर २०२५ : बीड जिल्ह्यात महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेल्या रेस्पिफ्रेश कफ सिरपचा मोठा साठा आढळून आला आहे. ही कारवाई अन्न व औषध प्रशासन विभागाने केली असून, परळी, गेवराई आणि आष्टी परिसरातून तब्बल 500 बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत.

मध्यप्रदेशात या कफ सिरपमुळे 20 हून अधिक लहान मुलांचा मृत्यू झाला होता. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने रेस्पीफ्रेश टीआर नावाच्या कफ सिरपवर बंदी घातली आहे. बीडमध्ये आढळलेला साठा पुण्यातील एका एजन्सीकडून पुरवठा झाल्याचे समजते.

जिल्हा प्रशासन सध्या या औषधाचा साठा कोणत्या मेडिकलपर्यंत पोहोचला याचा शोध घेत आहे. साठा जप्त करून तो परत मागविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. बीड जिल्ह्यातील शल्यचिकित्सक डॉक्टर राऊत यांनी माहिती दिली की, सध्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात साठा नाही, मात्र दोन बॅच नंबर उपलब्ध आहेत आणि त्यांचा वापर किंवा विक्री करण्यास मनाई करण्यात आली आहे.

सदर कारवाईमुळे नागरिकांसाठी सुरक्षित औषध पुरवठा सुनिश्चित होणार आहे. अन्न व औषध प्रशासनाने सतर्क राहून बंदी घालण्यात आलेल्या औषधांची विक्री थांबवण्याचे आदेश दिले आहेत. औषधांचे योग्य प्रमाणात विक्री होत नसल्यास भविष्यात गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात, म्हणून प्रशासनाची ही कारवाई महत्वाची मानली जात आहे.

भविष्यात अशा प्रतिबंधित औषधांचा साठा आढळू नये यासाठी मेडिकल्स, एजन्सी आणि नागरिकांनीही प्रशासनाच्या सूचना काटेकोर पाळाव्यात, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *