मनोज जरांगे पाटील यांचा धाराशिव दौरा आज; मराठा आंदोलनाच्या तयारीचा आढावा
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आज धाराशिव दौऱ्यावर, मुंबईतील आंदोलनाची तयारी सुरु
मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील आज धाराशिव दौऱ्यावर असून ते मराठा समाज व लोकप्रतिनिधींशी चर्चा करणार आहेत. मुंबईतील आंदोलनाची तयारी आणि पुढील दिशा याचा आढावा घेत रात्री धाराशिवमध्ये मुक्काम करून उद्या सोलापूरकडे रवाना होणार आहेत.
सायली मेमाणे
धाराशिव ५ ऑगस्ट २०२५ : धाराशिव – मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सातत्याने आंदोलने करणारे आणि राज्यभरात जनजागृती दौरे घेणारे मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील आज (५ ऑगस्ट) धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान ते मराठा समाजातील नागरिकांशी तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींशी चर्चा करणार आहेत.
मनोज जरांगे पाटील हे मुंबईत होणाऱ्या आगामी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जनतेचा आणि कार्यकर्त्यांचा आढावा घेत आहेत. धाराशिव दौऱ्याचा उद्देश हा राज्याच्या विविध भागांतील मराठा समाजाचा प्रतिसाद समजून घेणे आणि आंदोलनाची रणनीती ठरवणे असा आहे. विशेषतः मुंबईतील आगामी आंदोलनाची रूपरेषा ठरवण्यासाठी हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.
जरांगे पाटील हे आज रात्री धाराशिवमध्ये मुक्कामी राहणार असून, उद्या सकाळी ते सोलापूरकडे रवाना होतील. त्यांच्या प्रत्येक दौऱ्याला मराठा समाजाकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. मराठा आरक्षणासाठीच्या लढ्याला गती देण्यासाठी ते राज्यभरात संवाद साधत आहेत.
या दौऱ्यात ते विविध नेत्यांशी, समाजातील तरुणांशी आणि महिला कार्यकर्त्यांशी संवाद साधून आंदोलन अधिक बळकट करण्याचा प्रयत्न करत आहेत.