महाराष्ट्रातील सर्व पात्र शेतकऱ्यांची कर्जमाफी 30 जूनपूर्वी—मुख्यमंत्री फडणवीसांची ग्वाही

0
महाराष्ट्रातील सर्व पात्र शेतकऱ्यांची कर्जमाफी 30 जूनपूर्वी—मुख्यमंत्री फडणवीसांची ग्वाही

महाराष्ट्रातील सर्व पात्र शेतकऱ्यांची कर्जमाफी 30 जूनपूर्वी—मुख्यमंत्री फडणवीसांची ग्वाही


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिले की राज्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांची कर्जमाफी 30 जूनपूर्वी पूर्ण केली जाईल. विरोधकांवर राजकारणाचा आरोप; अधिवेशनात विकास, विदर्भ-मराठवाडा प्रश्नांवर चर्चेला सरकार तयार.

पुणे ८ डिसेंबर २०२५ : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची घोषण करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट ग्वाही दिली की राज्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांची कर्जमाफी ३० जूनपूर्वी पूर्ण करण्यात येणार आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी विरोधकांवर राज्याची आर्थिक स्थिती जाणूनबुजून दिवाळखोर असल्याचे चित्र रंगवण्याचा आरोप केला. त्यांनी नमूद केले की आर्थिक ओढाताण असली तरी महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती इतर राज्यांच्या तुलनेत सक्षम असून, शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या योजनांसाठी निधी उपलब्ध आहे.

फडणवीस म्हणाले की विरोधकांकडे कोणताही ठोस अजेंडा नसून ते फक्त विरोधी पक्षनेत्याच्या खुर्चीसाठी धडपडत आहेत. त्यांनी २०१४ पूर्वी आणि त्यानंतरच्या काळात विशेषतः विदर्भात झालेल्या बदलांवर प्रकाश टाकला. गडचिरोली, ब्रम्हपुरी अशा भागांत पायाभूत सुविधा आणि सिंचन प्रकल्पांच्या रूपाने झालेल्या विकासाची आठवण करून देत त्यांनी विरोधकांना तथ्याधारित बोलण्याचा सल्ला दिला. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांपैकी ९० लाख म्हणजेच ९२ टक्के शेतकऱ्यांना मदत पोहोचली असून उर्वरित ८ टक्के प्रकरणे केवायसी समस्येमुळे प्रलंबित असल्याचे त्यांनी सांगितले.

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसंदर्भात परदेशी समिती नियम, ध्येय आणि धोरण अंतिम करत असून, एकाही पात्र शेतकऱ्याला वंचित ठेवले जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. १२ लाख शेतकऱ्यांचे प्रकरण मोठ्या प्रमाणावर सुटल्याची माहिती देत, कर्जमाफीबाबत सरकार पूर्णपणे कटिबद्ध असल्याचे त्यांनी पुन्हा अधोरेखित केले.

अधिवेशनाच्या संदर्भात फडणवीस यांनी सांगितले की कालावधी लहान असला तरी शनिवार-रविवार मिळून दोन अतिरिक्त कामकाजाचे दिवस आहेत. सामान्यतः दिवसाला ५ तास काम अपेक्षित असताना दररोज १० तास काम होत आहे. त्यामुळे विरोधकांनी मुद्दे सोडून गैरलागू वाद घालण्याऐवजी विदर्भ आणि मराठवाड्याच्या प्रश्नांवर ठोस चर्चा करावी, असे त्यांनी सुचवले. वन्यप्राणी हल्ल्यात मृत्यू झालेल्या प्रकरणांवर राज्य नवीन धोरण अंतिम करत असल्याची माहितीही त्यांनी दिली.

राजकीय चर्चेचा विषय ठरलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीबाबत बोलताना फडणवीस यांनी महायुतीने शक्य तेथे एकत्रितपणे लढत कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभे राहून चांगला प्रतिसाद मिळवला, असे सांगितले. तर मविआने कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडले असल्याचे आरोप करत त्यांनी आगामी महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसचा “फुगा फुटेल” असा दावा केला. पार्थ प्रकरणी योग्य ती चौकशी सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

विरोधी पक्षनेता पदाबद्दल उपस्थित झालेल्या प्रश्नांवर त्यांनी प्रतिक्रिया देत सांगितले की या पदाबाबत कोणताही निर्णय पीठासीन अधिकारी घेतात आणि सरकारचा त्यात हस्तक्षेप नसतो. विरोधकांनी पदासाठी भांडण्यापेक्षा जनतेच्या प्रश्नांसाठी भांडणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.

पत्रपरिषदेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील, अतुल सावे, शंभूराजे देसाई, संजय राठोड आणि राज्यमंत्री आशिष जयस्वाल उपस्थित होते.

Follow us on our social media handles:
Instagram – https://www.instagram.com/newsdotz/
YouTube – https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook – https://www.facebook.com/NewsDotz/
Twitter – https://x.com/NewsDotz

Also Read: Pune’s Latest Information

FacebookWhatsAppXTelegramThreadsLinkedInGmailShare

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed