मानाच्या पहिल्या कसबा गणपतीची प्राणप्रतिष्ठा: ढोल ताश्यांच्या गजरात बाप्पाचे आगमन
मानाच्या पहिल्या कसबा गणपतीची प्राणप्रतिष्ठा: ढोल ताश्यांच्या गजरात बाप्पाचे आगमन
पुण्याच्या ग्रामदैवत कसबा गणपतीची प्राणप्रतिष्ठा मोठ्या उत्साहात पार पडली. ढोल ताश्यांच्या गजरात, वाजत-गाजत मानाच्या पहिल्या गणपतीचे आगमन झाले.
सायली मेमाणे
पुणे २७ ऑगस्ट २०२५ : पुणे : मानाचा पहिला म्हणजेच पुण्याचे ग्रामदैवत कसबा गणपती यांची प्राणप्रतिष्ठा आज ढोल ताश्यांच्या गजरात आणि पारंपरिक उत्साहात पार पडली. दरवर्षीप्रमाणे यंदाही मिरवणुकीनंतर मांडवात गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली. शहरभरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून बाप्पाचे आगमन पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी झाली होती.
वाजत-गाजत, नगाऱ्यांच्या गजरात आणि ढोल ताश्यांच्या तालावर कसबा गणपतींची मिरवणूक काढण्यात आली. भक्तांनी “गणपती बाप्पा मोरया”च्या गजरात उत्सवाचे स्वागत केले. मानाच्या पहिल्या गणपतींची प्राणप्रतिष्ठा ही केवळ धार्मिक परंपरा नसून पुण्याच्या सांस्कृतिक वैभवाचं प्रतीक मानली जाते.
या प्राणप्रतिष्ठेच्या कार्यक्रमासाठी पुणेकरांसह विविध भागातील भक्त मोठ्या संख्येने हजर होते. शहरातील प्रमुख मंडळांनी देखील आपली उपस्थिती दर्शवली. कसबा गणपतीचे आगमन म्हणजेच गणेशोत्सवाच्या सोहळ्याची अधिकृत सुरुवात मानली जाते.