लालबागच्या राजाच्या अन्नछत्रावर वादंग: मुंबई पोलिस व अग्निशमन दलाने दिली नकार

0
लालबागच्या राजाच्या अन्नछत्रावर वादंग: मुंबई पोलिस व अग्निशमन दलाने दिली नकार

लालबागच्या राजाच्या अन्नछत्रावर वादंग: मुंबई पोलिस व अग्निशमन दलाने दिली नकार

गणेशोत्सवात लाखो भाविकांना प्रसादरूपी भोजन देण्यासाठी लालबागच्या राजाने अन्नछत्र सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र संभाव्य गर्दी, चेंगराचेंगरी आणि सुरक्षेचा धोका लक्षात घेऊन मुंबई पोलिस व अग्निशमन दलाने प्रस्ताव फेटाळला.

सायली मेमाणे

पुणे २७ ऑगस्ट २०२५ : गणेशोत्सवाची धामधूम सुरू असताना राज्यभरातील गणेशभक्तांचे सर्वात मोठे आकर्षण ठरतो तो म्हणजे लालबागचा राजा. दरवर्षी लाखो भाविक दर्शनासाठी गर्दी करत असतात. यंदा या भक्तांसाठी विशेष उपक्रम राबविण्याचा निर्णय मंडळाने घेतला होता.

लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने पेरू कंपाऊंड परिसरात तीन अन्नछत्र सुरू करण्याची योजना आखली होती. या व्यवस्थेमुळे एकावेळी 500 हून अधिक भाविकांना प्रसादरूपी भोजनाचा लाभ घेता येईल, अशी सोय करण्यात आली होती. यामुळे भाविकांना उत्सव काळात भोजनाची मोठी सोय झाली असती.

मात्र, संभाव्य गर्दी आणि सुरक्षेचे प्रश्न यामुळे या योजनेवर वादंग माजले आहे. मुंबई पोलिसांनी कायदा-सुव्यवस्थेचा धोका आणि चेंगराचेंगरी होण्याची शक्यता लक्षात घेऊन अन्नछत्राला परवानगी नाकारली. याशिवाय अग्निशमन दलानेही सुरक्षा नियमांचे उल्लंघन आणि अपघाताचा धोका लक्षात घेऊन हा प्रस्ताव फेटाळला.

या निर्णयामुळे अनेक गणेशभक्त नाराज झाले आहेत. कारण अन्नछत्राच्या माध्यमातून हजारो भाविकांना विनामूल्य भोजनाची सुविधा मिळाली असती. मात्र मंडळाला आता नव्याने नियोजन करावे लागणार आहे.

सध्या मुंबईत गणेशोत्सवाच्या काळात भाविकांच्या सोयीसाठी विविध संस्था आणि मंडळे वेगवेगळ्या उपक्रमांची अंमलबजावणी करत आहेत. परंतु, सुरक्षा आणि कायदा-सुव्यवस्था लक्षात घेऊन प्रशासनाने घेतलेले निर्णय अनिवार्य ठरत आहेत.

लालबागच्या राजाच्या अन्नछत्र प्रकरणामुळे उत्सवाच्या व्यवस्थापनात भाविकांच्या सोयी व सुरक्षेतील समतोल राखण्याचा महत्त्वाचा मुद्दा पुन्हा एकदा पुढे आला आहे.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed