राज्यात नवे महाबळेश्वर पर्यटनस्थळ; एकनाथ शिंदे यांनी दिले प्रकल्पाला वेग देण्याचे आदेश

1
सह्याद्रीच्या कुशीत ‘नवीन महाबळेश्वर

सह्याद्रीच्या कुशीत ‘नवीन महाबळेश्वर

राज्यात सह्याद्रीच्या कुशीत ‘नवीन महाबळेश्वर’ प्रकल्प आकारास; 294 गावे समाविष्ट, निसर्ग पर्यटनस्थळ, औषधी वनस्पती, रोजगारासाठी महत्त्वाकांक्षी विकास
सायली मेमाणे,

पुणे : ३१ मे २०२५ : सातारा जिल्ह्यातील सह्याद्रीच्या कुशीत ‘नवीन महाबळेश्वर’ हा महत्वाकांक्षी पर्यटन प्रकल्प उभा राहत असून, त्यासाठी 294 गावे निवडण्यात आली आहेत. या प्रकल्पाचा आढावा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकताच घेतला. त्यांनी महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळासह विविध संस्थांना या कामांना गती देण्याचे आदेश दिले आहेत. एमएमआरडीएकडून या प्रकल्पाचे नियोजन सुरू असून, विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून एमएसआरडीसीची नियुक्ती करण्यात आली आहे. सुरुवातीला 235 गावांचा समावेश होता, पण आता तो वाढवून 294 करण्यात आला आहे.

या प्रकल्पासाठी सातारा, जावळी आणि पाटण तालुक्यांतील गावांचा समावेश असून, सुमारे 1,15,300 हेक्टर क्षेत्रात हा प्रकल्प उभा राहणार आहे. समुद्रसपाटीपासून सुमारे 1200 मीटर उंचीवर असलेला हा परिसर निसर्गसंपन्न असून, घनदाट जंगल, वन्यजीव, धबधबे, औषधी वनस्पती, उपनद्या आणि ऐतिहासिक वास्तू यामुळे येथे पर्यटन विकासासाठी मोठी संधी आहे.

उपमुख्यमंत्री शिंदे यांनी या भागात वेलनेस सेंटर, निसर्गोपचार केंद्र उभारण्यासाठी डाबर, पतंजलीसारख्या नामांकित कंपन्यांना आकर्षित करण्याचा प्रस्ताव दिला आहे. तसेच पर्यावरणपूरक रस्ते, रोजगारनिर्मिती, आणि इको-टुरिझमच्या दृष्टीनेही प्रकल्प राबवण्याचे सूतोवाच त्यांनी केले.

याशिवाय तापोळा परिसरातील उत्तेश्वर मंदिर आणि त्याचा रोपवे प्रकल्प यांचीही प्रगती पाहण्यात आली. स्थानिकांना रोजगार मिळावा यासाठी पर्यटनाच्या माध्यमातून विकास साधण्याचे उद्दिष्ट या संपूर्ण उपक्रमामागे आहे. एमएसआरडीसीच्या प्रकल्पांबाबतही त्यांनी सुशोभीकरण, पावसाळ्यापूर्वीची कामे, राडारोडा हटवणे, बेरिकेड्स बसवणे अशा गोष्टी वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश दिले.

1 thought on “राज्यात नवे महाबळेश्वर पर्यटनस्थळ; एकनाथ शिंदे यांनी दिले प्रकल्पाला वेग देण्याचे आदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed