लाडकी बहीण योजना बंद होणार? सरकारचा नवा निर्णय महिलांसाठी धक्कादायक

0
लाडकी बहीण योजना बंद होणार? सरकारचा नवा निर्णय महिलांसाठी धक्कादायक

लाडकी बहीण योजना बंद होणार? सरकारचा नवा निर्णय महिलांसाठी धक्कादायक

लाडकी बहीण योजनेत मोठे बदल होण्याची शक्यता, रक्षाबंधनापूर्वी महिलांना मिळणारी आर्थिक मदत थांबणार? जाणून घ्या संपूर्ण अपडेट आणि सरकारी निर्णयाचा संभाव्य परिणाम.

सायली मेमाणे

पुणे ७ ऑगस्ट २०२५ : राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘लाडकी बहीण’ योजनेबाबत एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. पात्र महिलांना दर महिन्याला 1500 रुपये थेट बँक खात्यात मिळवून देणारी ही योजना आता वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर सरकार या योजनेबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे हजारो महिलांच्या हातून नियमित आर्थिक आधार जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

या योजनेअंतर्गत अडीच लाख रुपयांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबांतील महिलांना आर्थिक मदत दिली जाते. परंतु, योजना सुरू झाल्यापासून निकष न पाळता हजारो अपात्र लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेतल्याचं उघड झालं आहे. केवळ महिलांसाठी असलेल्या या योजनेचा लाभ 14,000 पुरुषांनी घेतल्याचं समोर आलं असून, हे प्रकरण अधिक गंभीर ठरत आहे.

तसेच, 65 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या महिला, सरकारी नोकरी करणाऱ्या महिला आणि इतर अपात्र व्यक्तींनीही या योजनेचा लाभ घेतल्यामुळे सरकारने चौकशीचे आदेश दिले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांना पुढील १५ दिवसांत खात्यांची माहिती जमा करण्याचे निर्देश देण्यात आले असून, ज्या महिलांनी नियमबाह्यपणे लाभ घेतला आहे, त्यांच्याकडून रक्कम वसूल केली जाणार आहे.

सध्या सरकारकडून या योजनेचे पुनरावलोकन सुरू असून, रक्षाबंधनापूर्वीच काही कठोर निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे. अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नसली तरीही, महिलांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. लाडकी बहीण योजना थांबली तर अनेक गरीब महिलांच्या आर्थिक सुरक्षेला मोठा धक्का बसेल. ही योजना सुरु ठेवावी की बंद करावी, यावर सरकारकडून येत्या काही दिवसांत अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याचं समजते.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed