लातूर तहसीलदार गाणं गायल्यामुळे सस्पेंड; सरकारी नियमांचे उल्लंघन

0
लातूर तहसीलदार गाणं गायल्यामुळे सस्पेंड; सरकारी नियमांचे उल्लंघन

लातूर तहसीलदार गाणं गायल्यामुळे सस्पेंड; सरकारी नियमांचे उल्लंघन

लातूर तालुक्यात तहसीलदार प्रशांत थोरात यांनी बदली निरोप समारंभात सरकारी खुर्चीवर बसून ‘याराना’ गाणं गायल्यामुळे सस्पेंड करण्यात आले. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल.

सायली मेमाणे

पुणे २१ ऑगस्ट २०२५ : लातूर : महाराष्ट्रातील लातूर तालुक्यात तहसीलदार प्रशांत थोरात यांच्यावर प्रशासनाने कारवाई केली आहे. त्यांच्या बदलीबद्दल आयोजित निरोप समारंभात त्यांनी सरकारी कार्यपद्धती आणि शिस्तेचे उल्लंघन केले, यामुळे त्यांना सस्पेंड करण्यात आले.

समारंभाच्या वेळेस प्रशांत थोरात यांनी सरकारी खुर्चीवर बसून अमिताभ बच्चन यांच्या प्रसिद्ध चित्रपट ‘याराना’ मधील गाणे ‘यारा तेरी यारी को’ गायले. हा गोड मजेशीर प्रसंग उपस्थित लोकांसाठी आकर्षक ठरला आणि लोकांनी ताळ्या वाजवून त्यांचा उत्साह वाढविला.

पण प्रशासनाच्या दृष्टीने हा प्रकार नियमविरोधी ठरला. हा प्रसंग सोशल मीडियावर व्हायरल होताच, तहसीलदारांच्या सस्पेन्शनची माहिती सार्वजनिक करण्यात आली. सरकारी नियम आणि शिस्तेचा भंग करून अधिकारी सार्वजनिक कार्यक्रमात गाणं गायला याच कारणास्तव ही कारवाई करण्यात आली.

यावेळी प्रशासनाने स्पष्ट केले की, सरकारी कर्मचाऱ्यांनी सार्वजनिक कार्यक्रमातही नियमांचे पालन करणे आवश्यक आहे आणि कोणत्याही प्रकारचा अपवित्र व्यवहार सहन केला जाणार नाही.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *