लोणी काळभोरमध्ये गुंडाची मयूरी! मध्यरात्री रस्ता अडवून बर्थडे सेलिब्रेशन; 13 अटक, 3 फरार

0
लोणी काळभोरमध्ये गुंडाची मयूरी! मध्यरात्री रस्ता अडवून बर्थडे सेलिब्रेशन; 13 अटक, 3 फरार

लोणी काळभोरमध्ये गुंडाची मयूरी! मध्यरात्री रस्ता अडवून बर्थडे सेलिब्रेशन; 13 अटक, 3 फरारलोणी काळभोरमध्ये गुंडाची मयूरी! मध्यरात्री रस्ता अडवून बर्थडे सेलिब्रेशन; 13 अटक, 3 फरार


लोणी काळभोरमध्ये अट्टल गुंड राज पवारचा वाढदिवस रस्ता अडवून साजरा केल्याचा प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी 13 जणांना अटक केली असून तीन आरोपी फरार आहेत.

पुणे १९ डिसेंबर २०२५ : लोणी काळभोर परिसरात कायदा आणि सुव्यवस्थेला थेट आव्हान देणारा धक्कादायक प्रकार समोर आला असून, अट्टल गुंडाचा वाढदिवस चक्क रस्ता अडवून मध्यरात्री साजरा करण्यात आला. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. लोणी काळभोर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत अवघ्या काही तासांत 13 जणांना अटक केली असून तीन आरोपी फरार झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथील राज रविंद्र पवार हा लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुख्यात गुन्हेगार आहे. नागरिकांना शस्त्राचा धाक दाखवून लुटमार करणे, कोयत्याने वार करणे आणि परिसरात दहशत पसरवणे अशा गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांमध्ये त्याचा सहभाग राहिला आहे. त्याच्या वाढत्या गुन्हेगारी पार्श्वभूमीमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याने त्याला पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले होते.

गुरुवारी मध्यरात्री राज पवारचा वाढदिवस असल्याने त्याचे अनेक साथीदार कदमवाकवस्ती परिसरात जमले. या सर्वांनी मिळून बेकायदेशीर जमाव जमवला आणि वाहतुकीचा मुख्य रस्ता अडवून धांगडधिंगा घातला. राज पवारचा जयघोष करण्यात आला, तसेच हवेत हत्यारे भिरकावून परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते आणि काही काळ वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती.

या घटनेची माहिती मिळताच लोणी काळभोर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांचा बंदोबस्त पाहताच काही आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. पोलिसांनी तातडीने कारवाई करत 16 जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून त्यापैकी 13 जणांना अटक करण्यात आली आहे. उर्वरित तीन आरोपी फरार असून त्यांचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत.

या प्रकरणी आरोपींविरोधात भारतीय न्याय संहिता कलम 126(2), 189(1), 189(2), 189(4), भारतीय हत्यार कायदा कलम 4/25, महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 37(1)(2)(3) सह 135 तसेच क्रिमिनल अमेंडमेंट कायदा कलम 3 व 7 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी स्पष्ट केले आहे की, सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारची दहशत माजवणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार असून कुणालाही कायदा हातात घेण्याची मुभा दिली जाणार नाही.

लोणी काळभोर परिसरात वारंवार गुन्हेगारी प्रकार घडत असल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. या घटनेनंतर पोलिसांनी परिसरात गस्त वाढवली असून, फरार आरोपींना लवकरच अटक केली जाईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्या अशा प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी पोलिस प्रशासन सतर्क असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

Follow us on our social media handles:
Instagram – https://www.instagram.com/newsdotz/
YouTube – https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook – https://www.facebook.com/NewsDotz/
Twitter – https://x.com/NewsDotz

Also Read: Pune’s Latest Information

FacebookWhatsAppXTelegramThreadsLinkedInGmailShare

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed