वादग्रस्त भाजप नेत्यांच्या अटकेसाठी महिलांचा रस्त्यावर एल्गार..गुलाबो गँगचे “जोडे मारो” आंदोलन!

0
वादग्रस्त भाजप नेत्यांच्या अटकेसाठी महिलांचा रस्त्यावर एल्गार..गुलाबो गँगचे "जोडे मारो" आंदोलन!

वादग्रस्त भाजप नेत्यांच्या अटकेसाठी महिलांचा रस्त्यावर एल्गार..गुलाबो गँगचे "जोडे मारो" आंदोलन!

रिपोर्टर : झोहेब शेख

पुणे, दि. २६ जून: भवानी पेठेतील रामोशी गेट चौक येथे आज गुलाबो गँगच्या महिलांनी भाजपा पदाधिकारी ओंकार कदम आणि प्रमोद कोंढरे यांच्या विरोधात ‘जोड़े मारो’ आंदोलन करून संताप व्यक्त केला. या आंदोलनाद्वारे महिलांनी दोन्ही नेत्यांच्या अटकेची जोरदार मागणी केली.

गुलाबो गँगच्या महिलांनी भाजपा पदाधिकारी ओंकार कदम आणि प्रमोद कोंढरे यांच्या विरोधात 'जोड़े मारो' आंदोलन करून संताप व्यक्त केला.
गुलाबो गँगच्या महिलांनी भाजपा पदाधिकारी ओंकार कदम आणि प्रमोद कोंढरे यांच्या विरोधात ‘जोड़े मारो’ आंदोलन करून संताप व्यक्त केला.

महानगरपालिकेतील महिला अधिकारी व पुण्यातील वरिष्ठ महिला पोलीस अधिकाऱ्यांसोबत कथित गैरवर्तन आणि विनयभंग केल्याचा आरोप या नेत्यांवर आहे. विशेषतः भाजप पदाधिकारी प्रमोद कोंढरे यांच्यावर यासंदर्भातील गुन्हा दाखल झाल्यानंतर महिलांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

या संतापाच्या पार्श्वभूमीवर महिलांनी चौकात या दोघांचे पोस्टर लावून त्यावर जोडे मारले. “भाजपाचे दुर्योधन-दुःशासन, इनपे करो कडक से कडक शासन!” अशा घोषणा देत महिलांनी निषेध व्यक्त केला.

या आंदोलनात गुलाबो गँगच्या संगीता तिवारी, शोभा पणीकर, सोनिया ओव्हाळ, सुनीता नेमुर, रजिया बेल्लारी, पपिता सोनवणे, मनिषा गायकवाड, रेणू भिलारे, कीर्ती ओसवाल, नीता कुलकर्णी आणि अनेक ज्येष्ठ महिला, मुली सहभागी होत्या.

महिलांचा स्पष्ट आग्रह आहे की भाजपने या प्रकरणी भूमिका घ्यावी आणि पोलिसांनी तत्काळ कठोर कारवाई करून संबंधित नेत्यांना अटक करावी. पुणेकर महिलांचा आवाज आता थांबवता येणार नाही, असा ठाम संदेश या आंदोलनाच्या माध्यमांतून दिला आहे.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *