Sangli Accident : आधी बाबा गेले, आता शर्वरी… कॉलेजला जाताना एसटी बसने घेतला जीव

0
सांगलीत दुचाकीस्वार विद्यार्थिनी शर्वरी कुलकर्णीचा एसटी बसच्या धडकेत जागीच मृत्यू.

सांगलीत दुचाकीस्वार विद्यार्थिनी शर्वरी कुलकर्णीचा एसटी बसच्या धडकेत जागीच मृत्यू.

सांगलीत दुचाकीस्वार विद्यार्थिनी शर्वरी कुलकर्णीचा एसटी बसच्या धडकेत जागीच मृत्यू. मुंबई-जमखंडी बस सिव्हिल रोडवर धडकली दुर्दैवी अपघात. परिसरात शोककळा.

सायली मेमाणे

२६ जून २०२५ : सांगली – सांगली शहराच्या सिव्हिल हॉस्पिटल रोडवर गुरुवारी सकाळी एक हृदयद्रावक अपघात घडला. कॉलेजला जात असलेल्या 21 वर्षीय शर्वरी कुलकर्णी हिचा एसटी बसच्या चाकाखाली येऊन जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. शर्वरी ही सांगलीतील एका महाविद्यालयात बीसीएच्या शेवटच्या वर्षाला शिकत होती.

घटना जयमातृभूमी व्यायाम मंडळासमोर सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली. शर्वरी नेहमीप्रमाणे दुचाकीवरून कॉलेजकडे जात होती. यावेळी मुंबईहून जमखंडीला जाणाऱ्या एसटी बसने तिच्या दुचाकीला धडक दिली. दुर्दैवाने, बसच्या मागच्या चाकाखाली तिचं डोकं आल्यामुळे जागीच तिचा मृत्यू झाला.

अपघातानंतर काही अंतरावर बस थांबली, मात्र त्या काही क्षणातच शर्वरीचा जीव गेला होता. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. माहिती मिळताच शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि मृतदेह शासकीय रुग्णालयात हलवण्यात आला.

मयत शर्वरी कुलकर्णी (वय 21, रा. हरिपूर) ही आपल्या आई व बहिणीसोबत राहत होती. तिचे वडील यांचे काही वर्षांपूर्वी निधन झाले होते. त्यामुळे घराची जबाबदारी मोठ्या प्रमाणावर तिच्यावर होती. शर्वरी ही एक शांत, अभ्यासू आणि कष्टाळू विद्यार्थिनी म्हणून परिचित होती.

या घटनेनंतर परिसरातील नागरिक, विद्यार्थी आणि शिक्षक मंडळींतून तीव्र दुःख व्यक्त होत आहे. एका तरुणीचे कॉलेजमध्ये जाण्याचे स्वप्न काही क्षणात विखुरले गेले. या अपघातामुळे अनेकांच्या डोळ्यांत पाणी आले. पोलीस अधिकाऱ्यांनी या प्रकरणी एसटी चालकाविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

🕯️ शर्वरीच्या अपघाती मृत्यूने सांगलीतील महाविद्यालयीन वर्तुळात शोककळा पसरली आहे.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed