संजय कपूर : 30 हजार कोटींच्या संपत्तीच्या वादात संजय कपूर यांच्या पत्नीचा मोठा निर्णय!

Sunjay Kapur: 30 हजार कोटींच्या संपत्तीच्या वादात पत्नी प्रिया सचदेव यांचा धक्कादायक निर्णय!
संजय कपूर यांच्या मृत्यूनंतर 30,000 कोटी रुपयांच्या मालमत्तेवरून पत्नी प्रिया सचदेव आणि सासू रानी कपूर यांच्यात वाद चिघळला आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवर प्रियाने घेतलेला नावबदलाचा निर्णय चर्चेत.
सायली मेमाणे
पुणे 30 जुलै २०२५ : संजय कपूर यांच्या मृत्यूनंतर जवळपास ३०,००० कोटी रुपयांच्या मालमत्तेवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. त्यांची पत्नी प्रिया सचदेव आणि सासू रानी कपूर यांच्यात मालमत्तेच्या वाटपावरून प्रचंड तणावाचे वातावरण आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवर प्रिया सचदेव यांनी आपल्या नावात बदल करत ‘प्रिया सचदेव कपूर’ ऐवजी ‘प्रिया सचदेव’ असे नाव इन्स्टाग्रामवर वापरण्यास सुरुवात केली आहे. त्यांच्या इन्स्टाग्राम बायोमधून ‘कपूर’ हे आडनाव हटवले गेले असून, या कृतीमागे कौटुंबिक मतभेद कारणीभूत असल्याची चर्चा जोर धरते आहे.
संजय कपूर हे ‘सोना कॉमस्टार’ आणि ‘सोना ग्रुप’ या कंपन्यांचे प्रमुख होते. त्यांच्या अचानक मृत्यूनंतर त्यांच्या बिझनेस साम्राज्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रिया आणि रानी कपूर यांच्यात तीव्र वाद सुरू आहे. कंपनीचे शेअरहोल्डिंग, आर्थिक अधिकार आणि इतर मालमत्तेच्या वाटपावरून दोघींमध्ये मतभेद वाढले आहेत. या वादात कायदेशीर प्रक्रिया देखील सुरू झाल्याचं कळतंय.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, रानी कपूर यांनी प्रिया सचदेव यांच्यावर संपत्तीच्या वाटपात पारदर्शकता न बाळगण्याचा आरोप केला आहे. त्यांनी काही महत्त्वाच्या आर्थिक कागदपत्रांवर सह्या करण्यास नकार दिला असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे हा वाद केवळ कौटुंबिक मर्यादेत न राहता कायदेशीर स्वरूप धारण करू लागला आहे.
संजय कपूर हे उद्योगविश्वात एक प्रतिष्ठित नाव मानले जात होते. त्यांची कंपनी Sona BLW Precision Forgings Ltd. ही भारतातील आघाडीची ऑटोमोबाइल कंपोनंट उत्पादक कंपनी आहे. शेअर बाजारात या कंपनीचे शेअर्स अत्यंत मागणीत होते. त्यांच्या मृत्यूनंतर कंपनीच्या नेतृत्वात आणि मालकी हक्कात बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
प्रिया सचदेव यांनी ‘कपूर’ आडनाव हटविल्यानंतर सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया उमटल्या आहेत. काही लोकांनी त्यांच्या निर्णयाचे समर्थन करत तो त्यांच्या आत्मसन्मानाचा भाग असल्याचे म्हटले आहे, तर काहींनी त्यांचा निर्णय भावनिक असू शकतो असे मत व्यक्त केले आहे. काही यूजर्सनी हा निर्णय त्यांचा संपत्तीपासून वेगळे होण्याचा इशारा आहे असेही नमूद केले आहे.
इंटरनेट युजर्स यावर विविध प्रकारे व्यक्त होत आहेत. काही म्हणतात की एका विधवेला आपला आत्मसन्मान जपण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि तिचा निर्णय समजून घेण्यासारखा आहे. काहीजण हा वाद पुढे अजून किती खोल जाणार याची उत्सुकता व्यक्त करत आहेत. तर काहींचं म्हणणं आहे की फक्त नाव बदलणे म्हणजे संपत्तीपासून बाजूला होणे नव्हे.
Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter