14व्या मजल्यावरून पडून निवृत्त एसबीआय मॅनेजरचा मृत्यू; स्कायवॉकचा स्लॅब कोसळल्याने अपघात

0
14व्या मजल्यावरून पडून निवृत्त एसबीआय मॅनेजरचा मृत्यू; स्कायवॉकचा स्लॅब कोसळल्याने अपघात

14व्या मजल्यावरून पडून निवृत्त एसबीआय मॅनेजरचा मृत्यू; स्कायवॉकचा स्लॅब कोसळल्याने अपघात

हरियाणातील फरीदाबादमध्ये 14व्या मजल्यावरून स्कायवॉकचा स्लॅब तुटून पडल्याने निवृत्त एसबीआय मॅनेजर कुलवंत सिंग यांचा मृत्यू. झाडांना पाणी घालण्याच्या वेळी घडला अपघात. वाचा सविस्तर बातमी.

सायली मेमाणे

२५ जून २०२५ : फरीदाबाद, हरियाणा – फरीदाबादमधील सेक्टर-88 येथील आरपीएस सोसायटीमध्ये मंगळवारी एक भीषण अपघात घडला. स्टेट बँक ऑफ इंडियामधून व्यवस्थापक पदावरून निवृत्त झालेले 74 वर्षीय कुलवंत सिंग यांचा स्कायवॉकचा स्लॅब कोसळून मृत्यू झाला. झाडांना पाणी घालण्यासाठी 14व्या मजल्यावर गेले असताना, स्कायवॉकवरील गंजलेल्या भागावर पाय पडल्याने त्यांचा तोल गेला आणि ते 1300 फूट उंचीवरून थेट खाली कोसळले. या भीषण अपघातात त्यांचे शरीर दोन तुकड्यांमध्ये विभागले गेले.

कुलवंत सिंग यांचा मुलगा हर्षित, सून आणि नातवंडांसह या टॉवरमध्ये राहत होता. अपघात घडल्यानंतर काही क्षणांतच सोसायटीतील लोकांनी जमाव केला. अपघातावेळी कुटुंबातील इतर सदस्य फ्लॅटमध्येच होते, मात्र कोणालाच ही घटना कळली नाही. काही नागरिकांनी कुलवंत सिंग यांना पडताना पाहिले आणि लगेचच पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला.

कुलवंत सिंग मूळचे हिमाचल प्रदेशातील असून, गेल्या अनेक वर्षांपासून फरीदाबादमध्ये राहत होते. त्यांनी 15 वर्षांपूर्वी एसबीआयमधून निवृत्ती घेतली होती. त्यांच्या पत्नीचे निधन झाले असून सध्या ते एकुलत्या मुलगा हर्षितसोबत राहत होते. त्यांना दोन मुली असून त्या परदेशात स्थायिक आहेत. त्यांच्या मृत्यूची माहिती दोघींनाही देण्यात आली आहे.

या प्रकरणी पोलिसांनी अपघाताची नोंद घेतली असून स्कायवॉकच्या स्ट्रक्चरल स्थितीची चौकशी सुरू करण्यात आली आहे. सोसायटीतील इतर रहिवाशांनीही इमारतीच्या देखभालीकडे दुर्लक्ष होत असल्याची तक्रार केली आहे.

Do-follow Links:
Instagram: https://www.instagram.com/newsdotz/
YouTube: https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook: https://www.facebook.com/profile.php?id=61573903448264
Twitter: https://x.com/NewsDotz

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed