CJI Bhushan Gavai: सर्वोच्च न्यायालयात बूट फेकण्याचा प्रयत्न

0
CJI Bhushan Gavai: सर्वोच्च न्यायालयात बूट फेकण्याचा प्रयत्न

CJI Bhushan Gavai: सर्वोच्च न्यायालयात बूट फेकण्याचा प्रयत्न


सुप्रीम कोर्टात सरन्यायाधीश बी.आर. गवई यांच्यावर एका वकिलाने बूट फेकण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या वकिलाने “सनातन धर्माचा अपमान सहन होणार नाही” असे सांगितले.


सायली मेमाणे

पुणे ६ ऑक्टोबर २०२५ : सर्वोच्च न्यायालयात सोमवारी एका वकिलाने अचानक गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. माहिती मिळाल्याप्रमाणे, या वकिलाने भारताचे सरन्यायाधीश (CJI) बी.आर. गवई यांच्यावर बूट फेकण्याचा प्रयत्न केला. वकिलाने कोर्टरूममध्ये ओरडत म्हटले की, “आम्ही सनातन धर्माचा अपमान सहन करणार नाही.”

या प्रकरणामुळे कोर्टात तणावाचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करत आरोपी वकिलाला ताब्यात घेतले. वकिलाला बाहेर नेताना तो अद्यापही सनातन धर्माच्या अपमानाबाबत आपले मत व्यक्त करत होता.

घटनेनंतर सरन्यायाधीश गवई यांनी शांत राहून न्यायालयीन कामकाज नेहमीप्रमाणे सुरू ठेवण्याचे निर्देश दिले. त्यांनी म्हटले की, अशा घटनांमुळे त्यांना काही फरक पडत नाही आणि न्यायालयीन कामकाजावर परिणाम होणार नाही.

या घटनेनंतर बार अँड बेंचच्या वृत्तानुसार, सर्वोच्च न्यायालयामध्ये सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली. वकिलांच्या हल्ल्याचा प्रयत्न ही अत्यंत गंभीर घटना मानली जात आहे, आणि यावर कारवाई करण्यासाठी पोलिस तपास सुरू आहे.

सरन्यायाधीश गवई यांच्या शांत आणि संयमी प्रतिसादामुळे कोर्टरूममध्ये कामकाज सुरळीतपणे सुरू राहिले. या घटनेने संपूर्ण देशात चर्चेला उधाण आले असून, सोशल मीडियावरही व्हायरल झालेले व्हिडिओ पाहायला मिळत आहेत.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed