IND vs AUS: मोहम्मद शमीने टीम इंडियाच्या निवडकर्त्यांवर साधला निशाणा; ‘मी रणजी ट्रॉफी खेळू शकतो, पण…’

0
मोहम्मद शमीने टीम इंडियाच्या निवडकर्त्यांवर साधला निशाणा; ‘मी रणजी ट्रॉफी खेळू शकतो, पण…’

मोहम्मद शमीने टीम इंडियाच्या निवडकर्त्यांवर साधला निशाणा; ‘मी रणजी ट्रॉफी खेळू शकतो, पण…’

भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या मालिकेसाठी मोहम्मद शमीला संघात स्थान मिळालेले नाही. शमीने ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी न निवडले जाण्याबद्दल नाराजी व्यक्त केली आणि निवडकर्त्यांवर निशाणा साधला.

सायली मेमाणे

पुणे १५ ऑक्टोबर २०२५ : भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या दरम्यान १९ ऑक्टोबरपासून तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका आणि त्यानंतर ५ टी-२० सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे. या मालिकेसाठी रोहित शर्मा, विराट कोहली आणि श्रेयस अय्य्यर सारख्या स्टार फलंदाजांची संघात निवड करण्यात आली आहे. मात्र, बराच काळ भारतीय संघाबाहेर असलेला वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी संघात स्थान मिळवू शकला नाही.

पश्चिम बंगालकडून रणजी ट्रॉफी खेळण्यासाठी ईडन गार्डन्सवर उतरणाऱ्या शमीने ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघात स्थान न मिळाल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. शमीने माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले की, “भारतीय संघ निवड माझ्या हातात नाही. माझे काम तयारी करण्याबरोबर सामने खेळणे आहे. जर मला तयारीसाठी सामने मिळाले किंवा कुठेही खेळण्याची संधी मिळाली, तर मी त्यासाठी तयार आहे. जर काही फिटनेस समस्या असती, तर मी येथे आज उपस्थितच नसतो. चार दिवसांचे सामने खेळू शकलो, तर मी ५० षटकांचे एकदिवसीय सामने देखील खेळू शकतो.”

शमीने पुढे स्पष्ट केले की, “निवडकर्त्यांना किंवा संघ व्यवस्थापनाला माझ्या फिटनेसबद्दल माहिती देणे हे माझे काम नाही. माझे काम फक्त तयारी करणे, सामने खेळणे आणि चांगली कामगिरी करणे आहे. अपडेट्स शेअर करणे व्यवस्थापन किंवा निवडकर्त्यांवर अवलंबून असते, मी फक्त माझ्या कामावर लक्ष केंद्रित करतो. मी बराच काळ क्रिकेटपासून लांब आहे, परंतु मी चांगल्या स्थितीत आहे आणि नियमित सराव करत आहे. माझे ध्येय नेहमीच पूर्णपणे तंदुरुस्त असताना संघात परतणे आहे, आणि दुखापतीचा धोका पत्करून लवकर परतणे नाही.”

शमीच्या या वक्तव्यातून स्पष्ट होते की, त्याने संघात परतण्याची तयारी पूर्ण केली असून, परंतु निवड समितीच्या निर्णयाबद्दल तो नाराज आहे. रणजी ट्रॉफीमध्ये सक्रिय असलेल्या शमीची कामगिरी आणि तंदुरुस्ती लक्षात घेतली तर भारतीय संघाला ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी त्याची गरज असू शकते.

मोहम्मद शमीच्या वक्तव्यामुळे भारतीय क्रिकेट संघाचे निवड प्रक्रिया आणि व्यवस्थापनावर प्रश्न उपस्थित होतात. चाहत्यांना शमीच्या फिटनेस आणि त्याच्या भविष्यातील संघात परतण्याच्या शक्यतांबाबत उत्सुकता आहे. शमीची तयारी आणि रणजी ट्रॉफीतील कामगिरी लक्षात घेता, तो लवकरच भारतीय संघात परतण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

शमीने स्पष्ट केले की त्याचा फोकस नेहमीच मैदानावर आणि कामगिरी सुधारण्यात आहे. निवडकर्त्यांचा निर्णय असो वा संघ व्यवस्थापनाचे, शमीची प्राथमिकता खेळातील तयारी, फिटनेस आणि उत्कृष्ट कामगिरीवर राहणार आहे.

या वक्तव्यामुळे क्रिकेट चाहत्यांमध्ये शमीच्या संघात परतण्याबाबत चर्चेला गती मिळाली आहे. IND vs AUS मालिकेसाठी संघात शमीची गैरहजेरी आणि त्याचा संघाबद्दलचा दृष्टिकोन चर्चा विषय ठरला आहे.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed