Pune Fire News: लक्ष्मीपूजनाच्या रात्री पुण्यात 60 हून अधिक ठिकाणी आग

0
Pune Fire News: लक्ष्मीपूजनाच्या रात्री पुण्यात 60 हून अधिक ठिकाणी आग

Pune Fire News: लक्ष्मीपूजनाच्या रात्री पुण्यात 60 हून अधिक ठिकाणी आग

पुण्यात लक्ष्मीपूजनाच्या रात्री फटाक्यांच्या आतषबाजीमुळे 24 तासांत 60 हून अधिक आगच्या घटनांची नोंद. कोणतीही जखमी नाही, मात्र मोठे मालमत्तेचे नुकसान.

सायली मेमाणे

पुणे २३ ऑक्टोबर २०२५ : पुणे: लक्ष्मीपूजनाच्या रात्री पुण्यात आग लागल्याची भीषण घटना घडली. शहरभर फटाक्यांच्या आतषबाजीमुळे फुरसुंगी, खराडी, कोरेगाव पार्क, भवानी पेठ, नाना पेठ, टिंगरे नगर, बाणेर, मार्केटयार्ड, कात्रज, धानोरी, येरवडा, हडपसर आणि इतर भागांत तब्बल 60 हून अधिक आग लागल्याच्या घटनांची नोंद झाली आहे. सोमवारी रात्रीपासून मंगळवारी रात्रीपर्यंतच्या 24 तासांत या घटना घडल्या.

अग्निशमन दलाच्या मुख्य नियंत्रण कक्षाच्या अहवालानुसार, यातील 42 घटना केवळ लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सायंकाळी 5 नंतर घडल्या आहेत. सुदैवाने, कोणतीही व्यक्ती जखमी झाली नाही, मात्र अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात मालमत्तेचे नुकसान झाले आहे.

  • फुरसुंगी: एका उंच इमारतीच्या दहाव्या मजल्यावर पेटता रॉकेट पडल्याने गॅलरीतील पडदा जळाला.
  • खराडी: गेरा सोसायटीच्या आवारात पडलेल्या फटाक्यामुळे कचऱ्याला आग लागली.
  • हडपसर: लोहमार्गाजवळ गवत जळालं.
  • गणेश पेठ: डुल्या मारुती मंदिराजवळील चंद्रकांत शहा अँड कंपनी कार्यालय आणि गोदामात आग.
  • वडगाव शेरी: दुचाकीला आग लागली.
  • धानोरी: कलवड वस्तीत कचऱ्याला आग.
  • शुक्रवार पेठ: फडगेट पोलीस चौकीसमोर घराच्या छतावरील साचलेल्या पाला-पाचोळ्याला आग.

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी, सायंकाळी 5 वाजल्यानंतर शहरात मोठ्या प्रमाणात आतषबाजी झाली आणि रात्री 9 वाजेपर्यंत 42 ठिकाणी आग लागल्याच्या घटना घडल्या. याशिवाय हडपसर, वारजे, नन्हे, काळेपडळ, छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावर श्री दत्त मंदिराजवळील इमारतींची गच्ची, कसबा पेठेतील कागदीपुरा भागातील चौथ्या मजल्यावर, तसेच विमाननगरमधील संजय पार्क भागात नारळाच्या झाडावर पेटता फटका पडल्याने आग लागल्याची नोंदही झाली आहे.

या घटनांमुळे दिवाळीच्या काळात फटाक्यांच्या आतषबाजीच्या वेळी सुरक्षिततेचे नियम पाळणे किती आवश्यक आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. नागरिकांनी आग आणि फटाक्यांशी संबंधित खबरदारी घेणे अत्यंत गरजेचे आहे, जेणेकरून व्यक्ती आणि मालमत्तेची हानी टाळता येईल.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed