मुंबईत ब्रेकअपनंतर दहशत: मयुरेश बिल्डिंगजवळ वाद, चाकू हल्ल्यात दोघांचा मृत्यू
मुंबईत ब्रेकअपनंतर दहशत: मयुरेश बिल्डिंगजवळ वाद, चाकू हल्ल्यात दोघांचा मृत्यू
काळाचौकी परिसरात ब्रेकअपनंतर सोनू बराय आणि मनीषा यादव यांच्यात वाद झाला. सोनूने चाकूने वार करत मनीषावर हल्ला केला, नर्सिंग होमपर्यंत पाठलाग, अखेरीस दोघांचा मृत्यू; पोलिस आणि वाहतूक कॉन्स्टेबल किरण सूर्यवंशी तत्पर.
सायली मेमाणे
पुणे २५ ऑक्टोबर २०२५ : मुंबईच्या काळाचौकी परिसरात शुक्रवारी सकाळी भररस्त्यात एक थरारक घटना घडली. मयुरेश इमारतीसमोर ब्रेकअपनंतर वादाच्या ठिकाणी २४ वर्षीय सोनू बराय आणि मनीषा यादव यांच्यात झालेल्या झगड्यामुळे दोघांचा मृत्यू झाला.
सोनू आणि मनीषा काही काळापूर्वी प्रेमसंबंधात होते, मात्र दहा दिवसांपूर्वी त्यांचा ब्रेकअप झाला होता. शुक्रवारी साडेदहा वाजताच्या सुमारास दत्ताराम लाड मार्गावरील मयुरेश बिल्डिंगजवळ दोघांची अचानक भेट झाली. येथे त्यांच्यात वाद झाला. संतापलेल्या सोनूने खिशातून चाकू काढून मनीषावर वार करायला सुरुवात केली.
मनीषाने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, परंतु सोनूचा संताप रोखता आला नाही. जीव वाचवण्यासाठी मनीषा जवळच्या आस्था नर्सिंग होममध्ये धाव घेतली. परंतु सोनू तिच्या मागोमाग नर्सिंग होममध्ये पोहोचला आणि तिथेही तिला चाकूने हल्ला केला.
आजूबाजूला नागरिक जमल्याचे पाहून सोनूने त्याच चाकूने स्वतःचा गळा चिरला. घटनास्थळी रक्तरंजित शरिर पाहून पोलिस आणि नागरिक खळबळले.
सोनूला केईएम रुग्णालयात नेण्यात आले, जिथे त्याला मृत घोषित करण्यात आले. मनीषावर आंबेडकर रेल्वे रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. जटिल जखमांमुळे तिला नंतर जे. जे. रुग्णालयात हलवण्यात आले. अनेक चाकू वारांमुळे शरीरातून अतिरक्तस्त्राव झाल्याने उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
सोनूच्या हल्ल्याची माहिती वाहतूक पोलिस कॉन्स्टेबल किरण सूर्यवंशी यांना मिळाली. काही सेकंदही गमावता न जाता किरण यांनी घटनास्थळी धाव घेतली. मनीषाला नर्सिंग होममधून सुटका करून आंबेडकर रुग्णालयात त्वरित नेण्यात आले. त्यांचे तत्पर कार्यामुळे उपचार वेळेत मिळाले, तरी मृत्यू टाळता आला नाही.
भररस्त्यात घडलेली ही घटना मुंबईकरांसाठी धक्कादायक ठरली आहे. लोकांच्या सुरक्षेसाठी शहरात पोलिसांची उपस्थिती आणि तत्परता किती महत्त्वाची आहे, याचे हे उदाहरण आहे.
काळाचौकी परिसरात ब्रेकअपनंतर वाद
सोनूने चाकूने मनीषावर हल्ला केला
नर्सिंग होमपर्यंत पाठलाग
दोघांचा मृत्यू; सोनूने आत्महत्या केली
पोलिस आणि कॉन्स्टेबल तत्परतेने मनीषाला सुरक्षीत रुग्णालयात नेले