Bihar Election Result: राहुल गांधींची ‘घोड्याची गाडी’ पडली! सुलभा गायकवाडांचा भाजप विजयावर खोचक टोला

0
राहुल गांधींची ‘घोड्याची गाडी’ पडली! सुलभा गायकवाडांचा भाजप विजयावर खोचक टोला

राहुल गांधींची ‘घोड्याची गाडी’ पडली! सुलभा गायकवाडांचा भाजप विजयावर खोचक टोला

भाजप आमदार सुलभा गायकवाड यांनी बिहार निवडणुकीतील NDA आघाडी पाहून राहुल गांधींवर “घोड्याची गाडी पडली” असा खोचक टोला लगावला. भाजप नंबर 1 राहणार, अशी प्रतिक्रिया.

सायली मेमाणे

१४ नोव्हेंबर २०२५ बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल स्पष्ट होत असताना राजकीय नेत्यांकडून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. विशेषतः भाजपच्या अपेक्षेपेक्षा जास्त आघाडीचा कल दिसताच पक्षात उत्साहाचे वातावरण असून विरोधकांवर टीकेची झोड उठवली जात आहे. कल्याण पूर्वच्या भाजप आमदार सुलभा गायकवाड यांनी यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधींवर खोचक टोला लगावत पुन्हा एकदा राजकीय तापमान वाढवले आहे.

बिहार निकालांची प्रारंभिक आकडेवारी पाहत सुलभा गायकवाड म्हणाल्या, “राहुल गांधींची घोड्याची गाडी पडली… घोडेच पळाले!” त्यांच्या या टिप्पणीने सोशल मीडियासह राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. NDA आघाडीला मिळणारा प्रचंड प्रतिसाद पाहून त्यांनी भाजपच नंबर 1 होता, आहे आणि राहणार, असे ठामपणे सांगितले. बिहारमधील मतदारांनी विकासाचा मार्ग निवडला असून विरोधकांचे सर्व गणित कोलमडले असल्याचे त्यांनी म्हटले.

सध्या मिळणाऱ्या अपडेट्सनुसार बिहारमध्ये भाजप जोरदार आघाडीवर आहे. NDA मधील जेडीयू आणि इतर घटक पक्षांसह भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे येत आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि महाआघाडीला मोठा धक्का बसला आहे. त्यामुळेच सुलभा गायकवाड यांचा हा टोला विरोधकांच्या टीका आणि निवडणूक रणनीतीवर थेट प्रहार असल्याचे दिसते.

राहुल गांधी यांची प्रचारशैली, सभा आणि निवडणूक मोहीम या निवडणुकीत महत्त्वाच्या ठरल्या नव्हत्या, असा BJPचा दावा आहे. NDA ने विकास, सुरक्षा, रोजगार आणि केंद्राच्या योजनांचा आधार घेत प्रचार केला, तर महाआघाडी मतदारांपर्यंत हवा तेवढा पोहोचू शकली नाही, असेही भाष्य सुरू आहे.

सुलभा गायकवाड यांनी केलेला हा टोला निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर BJPच्या आत्मविश्वासाचे द्योतक मानला जातो. NDAला मिळणाऱ्या यशामुळे बिहारमधील राजकीय समीकरणे बदलतील आणि आगामी राष्ट्रीय राजकारणावरही याचा परिणाम संभवतो, असे विश्लेषक मानतात.

बिहार निवडणुकीचे अंतिम निकाल स्पष्ट होईपर्यंत राजकीय प्रतिक्रियांना वेग येण्याची शक्यता असून गायकवाड यांची टिप्पणी ही त्याचीच सुरुवात म्हणावी लागेल.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *