उरुळी कांचनचा राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत डंका; निर्माण अकॅडमीचे 17 पैकी 17 विद्यार्थी पदकविजेते

0
उरुळी कांचनचा राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत डंका; निर्माण अकॅडमीचे 17 पैकी 17 विद्यार्थी पदकविजेते

उरुळी कांचनचा राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत डंका; निर्माण अकॅडमीचे 17 पैकी 17 विद्यार्थी पदकविजेते

दिल्लीतील नॅशनल बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये उरुळी कांचनच्या निर्माण अकॅडमीचे सर्व 17 विद्यार्थी पदकविजेते ठरले. महाराष्ट्राने एकूण दुसरा क्रमांक मिळवला.

सायली मेमाणे

पुणे २९ नोव्हेंबर २०२५ : उरुळी कांचन आणि आसपासच्या पंचक्रोशीचा क्रीडा क्षेत्रातील दबदबा पुन्हा एकदा राष्ट्रीय पातळीवर उमटला आहे. दिल्लीतील अलीपूर येथे झालेल्या नॅशनल बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये निर्माण अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी तब्बल 17 पैकी 17 पदके जिंकत अभूतपूर्व कामगिरी केली आहे. विविध राज्यांतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेल्या या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राने एकूण दुसरा क्रमांक मिळवला असून, या यशामध्ये निर्माण अकॅडमीच्या खेळाडूंचा मोठा वाटा आहे.

उरुळी कांचनमधील निर्माण अकॅडमीने गेल्या काही वर्षांत ग्रामीण भागातील फाइटर्स तयार करण्यावर मोठा भर दिला आहे. या स्पर्धेसाठी अकॅडमीतील 17 विद्यार्थी पात्र ठरले आणि सर्वांनीच आपले सर्वोत्तम कौशल्य सादर करत पदके पटकावली. संपूर्ण गावात या यशाचा मोठा उत्साह पाहायला मिळाला. महाराष्ट्र टीममधील स्थानिक सर्व पदकविजेत्यांची गावकऱ्यांच्या वतीने भव्य मिरवणूक काढण्यात आली. ढोल-ताशांच्या गजरात गावकऱ्यांनी आपल्या खेळाडूंचा सत्कार करून त्यांना आशीर्वाद दिले.

या शानदार कामगिरीमागे प्रशिक्षक संदीप कांचन, शकील शेख आणि फरदीन शेख यांचे कसून प्रशिक्षण आणि शिस्तबद्ध मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले. नियमित सराव, शारीरिक तयारी, आहार आणि तांत्रिक कौशल्यांची जोड देत प्रशिक्षकांनी विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावर चमकण्यास प्रवृत्त केले.

भरतगावचे प्रतिनिधित्व करणारा स्पर्धक लोकेश उर्फ माऊली नानासाहेब जगदाळे यानेही सिल्वर मेडल जिंकत आपले गावाचे नाव राष्ट्रीय पातळीवर झळकवले. लोकेशच्या यशाबद्दल भरतगावमध्येही जल्लोष करण्यात आला.

पदक विजेत्यांची यादी

गोल्ड पदक विजेते:
शिवराज निकम, समर्थ कांचन, हरमन सिंग

सिल्वर पदक विजेते:
विवेक पांडे, श्लोक कुंजीर, आयुष प्रसाद, फैजान शेख, आदित्य चव्हाण, लोकेश जगदाळे, श्रीवर्धन कदम, रितेश चव्हाण, श्रीतेज कांचन, आर्या भाटे

ब्राँझ पदक विजेते:
सार्थक मचाले, समर्थ मचाले, सोहम शिंदे, यशराज बडेकर

या उत्तम कामगिरीमुळे महाराष्ट्राच्या बॉक्सिंग क्षेत्रात उरुळी कांचन आणि निर्माण अकॅडमीचे नाव आणखी उजळले आहे. ग्रामीण भागातूनही उच्च दर्जाचे खेळाडू तयार होऊ शकतात याचे हे मोठे उदाहरण ठरले आहे. गावकऱ्यांनी, पालकांनी आणि स्थानिक संस्थांनी विद्यार्थ्यांच्या सातत्याने केलेल्या मेहनतीचे कौतुक करत भविष्यातही असेच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय यश मिळो, अशी शुभेच्छा दिली.

राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत सर्व विद्यार्थ्यांनी पदके जिंकणे हे अत्यंत दुर्मिळ आणि प्रतिष्ठेचे यश मानले जात आहे. निर्माण अकॅडमीच्या टीमने केवळ उरुळी कांचनच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राचा मान उंचावला असून, येणाऱ्या काळात या विद्यार्थ्यांकडून आणखी मोठी कामगिरी अपेक्षित आहे.

Follow us on our social media handles:
Instagram – https://www.instagram.com/newsdotz/
YouTube – https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook – https://www.facebook.com/NewsDotz/
Twitter – https://x.com/NewsDotz

Also Read: Pune’s Latest Information

FacebookWhatsAppXTelegramThreadsLinkedInGmailShare

FacebookWhatsAppXTelegramThreadsLinkedInGmailShare

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *